मुंबई-गोवा महामार्गावरील ‘त्या’ बायपास रस्त्याचा मार्ग मोकळा; १९८ कोटींचा खर्च, मंजुरीसाठी केंद्राकडे प्रस्ताव सादर

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील इंदापूर-माणगाव बायपास रस्ते कामासाठी अखेर निविदाकारांनी प्रतिसाद दिला. एकूण पाच निविदाकारांनी प्रतिसाद दिला असला तरी २५ टक्के कमी दराने निविदा भरणाऱ्या कंपनीला कंत्राट देण्यात येणार आहे.
मुंबई-गोवा महामार्गावरील ‘त्या’ बायपास रस्त्याचा मार्ग मोकळा; १९८ कोटींचा खर्च, मंजुरीसाठी केंद्राकडे प्रस्ताव सादर
Published on

गिरीश चित्रे / मुंबई

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील इंदापूर-माणगाव बायपास रस्ते कामासाठी अखेर निविदाकारांनी प्रतिसाद दिला. एकूण पाच निविदाकारांनी प्रतिसाद दिला असला तरी २५ टक्के कमी दराने निविदा भरणाऱ्या कंपनीला कंत्राट देण्यात येणार आहे. संबंधित कंपनीचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे सादर केला असून मंजुरीनंतर वर्क ऑर्डर देणार आहे. ११ किमी लांब रस्ता असून यासाठी १९८ कोटींचा खर्च येणार असल्याचे सार्वजनिक बांधकाम विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

असे होणार काम

  • नवीन बायपास रस्ता करण्यासाठी आधी कच्चा रस्ता बनवणे

  • माणगाव, इंदापूर बायपास ११ किलोमीटर काम पूर्ण करण्याचा कालावधी १८ महिने

  • रेल्वे क्रॉसिंगजवळ ३ रोड ओव्हर पूल, दोन मोठे पूल

कमी खर्चात दर्जेदार काम देणाऱ्या कंपनीला कंत्राट

राज्य सरकारला कमी खर्चात दर्जेदार काम देणाऱ्या कंत्राटदार कंपनीला वर्क ऑर्डर देण्यात येते. यात २५ टक्के ते ४५ टक्के बिलो असणाऱ्या कंपनीला प्रथम प्राधान्य देण्यात येते. इंदापूर-माणगाव बाय पास रस्तेकामासाठी २५ टक्के कमी दराने बोली लावल्याने त्या संबंधित कंपनीला कंत्राट देण्यात येणार असल्याचे सार्वजनिक बांधकाम विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

logo
marathi.freepressjournal.in