कशेडी बोगद्यातील ९० टक्के पाण्याची गळती नियंत्रित; राष्ट्रीय महामार्ग विभाग, पेणचे स्पष्टीकरण

मुंबई–गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६६ वरील कशेडी घाटातील दुहेरी बोगद्यात पावसाळ्यात आढळलेल्या पाण्याच्या गळतीपैकी सुमारे ९० टक्के गळती नियंत्रित करण्यात आली आहे.
कशेडी बोगद्यातील ९० टक्के पाण्याची गळती नियंत्रित; राष्ट्रीय महामार्ग विभाग, पेणचे स्पष्टीकरण
कशेडी बोगद्यातील ९० टक्के पाण्याची गळती नियंत्रित; राष्ट्रीय महामार्ग विभाग, पेणचे स्पष्टीकरणसंग्रहित छायाचित्र
Published on

मुंबई : मुंबई–गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६६ वरील कशेडी घाटातील दुहेरी बोगद्यात पावसाळ्यात आढळलेल्या पाण्याच्या गळतीपैकी सुमारे ९० टक्के गळती नियंत्रित करण्यात आली आहे. पूर्ण झालेल्या मार्गावरून वाहतूक सुरळीत सुरू असल्याचे राष्ट्रीय महामार्ग विभाग, पेण यांनी स्पष्ट केले आहे.

कशेडी दुहेरी बोगदा हा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६६ वरील कशेडी घाट विभागाचा भाग आहे. पावसाळ्यात या परिसरातील अतिवृष्टी आणि भूजल परिस्थितीमुळे दोन्ही बोगद्यांतील काही ठिकाणी किरकोळ पाण्याची गळती आढळली आहे. पाण्याच्या गळतीची तांत्रिक तपासणी करून योग्य उपाययोजना निश्चित करण्यासाठी आयआयटी मुंबईचे प्रा. डी. एन. सिंह यांचा तांत्रिक अहवाल घेण्यात आला.

या शिफारशींनुसार निश्चित केलेल्या ठिकाणी आवश्यक ग्राऊटिंग आणि गनायटिंगची कामे करण्यात आली आहेत. या उपाययोजनांमुळे सुमारे ९० टक्के गळती नियंत्रित झाली असून, उर्वरित ठिकाणांवरील कामे प्रगतीपथावर आहेत. दोन्ही बोगद्यांवर देखरेख ठेवून सुधारात्मक उपाय प्राधान्याने करण्याच्या सूचना संबंधित यंत्रणेला देण्यात आल्या आहेत.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in