मुंबई-गोवा महामार्गाच्या सिंगल लेनचे काम पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्यात येईल - रवींद्र चव्हाण

सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आहेत. त्यामुळे कोकणवासियांच्या अपेक्षा वाढल्या आहेत
Ravindra chavan
Ravindra chavan

मुंबई : मुंबई-गोवा महामार्गाच्या सिंगल लेनचे काम पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्यात येईल, असे आश्वासन सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी सोमवारी विधानसभेत दिले. गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या कोकणातील मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या कामासंदर्भात विधानपरिषदेत भाजपा गटनेते आमदार प्रविण दरेकर यांनी प्रश्न उपस्थित केला. महामार्गाचे काम कधीपर्यंत पूर्ण होणार असा प्रश्न विचारला होता. त्यावर सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी उत्तर दिले.

गेली अनेक वर्ष मुंबई-गोवा या राष्ट्रीय महामार्गाचे जे काम सुरु आहे ते अत्यंत संथ गतीने सुरु आहे. शासनाने समृद्धी महामार्ग करून दाखवला. सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आहेत. त्यामुळे कोकणवासियांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. नुकतीच मंत्रालयात मंत्री रवींद्र चव्हाण यांनी कोकणातील आमदार, लोकप्रतिनिधी यांची बैठक घेतली. मुंबई आणि ठाणे येथील चाकरमानी उत्सवानिमित्त कोकणात सातत्याने ये-जा करतात. त्यामुळे या महामार्गाचे रखडलेले काम कधी पूर्ण होणार? तसेच या कामात नेमक्या काय अडचणी आहेत? असा प्रश्नही दरेकर यांनी केला.

डिसेंबरपर्यंत दोन्ही लेन पूर्ण होणार !

५५० किमीचा रस्ता बीओटी तत्वावर देण्याच्या संदर्भात निर्णय करण्यात आला. या निर्णयानंतर अनेक अडचणी होत्या. त्या दूर करण्यासाठी १०वर्ष लागली. यामध्ये भूसंपादन ही मोठी अडचण होती. सरकारी कामांत अडचणी होत्या. त्या अडचणी दूर करत आता पॉझीटिव्ह दिशेने काम सुरु आहे. सिंधुदुर्गातील रस्ता पूर्ण झाला आहे. रत्नागिरीतील परशुराम घाटासाठी चिरणी येथील रस्ता पर्यायी रस्ता म्हणून केला आहे. तर पनवेल ते कासु व कासु ते इंदापूरपर्यंत ८४ किमीच्या रस्त्याचे काम सुरु झाले आहे. यासाठी नव्याने दोन कंत्राटदारांना हे काम देण्याचे ठरवले आहे. मे महिन्यापर्यंत सिंगल लेन पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत. डिसेंबरपर्यंत दोन्ही लेन पूर्ण होण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरु आहेत. तसेच या कामाचे ऑडिट करण्याचे निर्देशही दिल्याचे चव्हाण यांनी सांगितले.

ड्रोनद्वारे रस्त्याच्या कामाची पाहणी

मंत्री रवींद्र चव्हाण यांनी सांगितले की, मुंबई-गोवा महामार्गाचे काम पाहण्यासाठी ड्रोनचा वापर केला जाणार आहे. यासाठी १० ड्रोन लागणार असून कंत्राटदाराला ते खरेदी करावे लागणार आहेत. तसेच कंत्राटदाराला व्हॉट्सअँप ग्रुप तयार करून दिवसभरात किती काम झाले याची माहिती द्यावी लागणार आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in