मुंबई-मडगाव उन्हाळी विशेष रेल्वे; कोकणातील प्रवाशांसाठी रेल्वेची अखेर खुशखबर

उन्हाळी सुट्टीनिमित्त गावी जाणाऱ्या प्रवाशांच्या सोईसाठी मध्य आणि कोकण रेल्वेने विशेष रेल्वेगाडी चालविण्याचा निर्णय घेतला आहे.
Indian Railway
संग्रहित फोटो
Published on

मुंबई : उन्हाळी सुट्टीनिमित्त गावी जाणाऱ्या प्रवाशांच्या सोईसाठी मध्य आणि कोकण रेल्वेने विशेष रेल्वेगाडी चालविण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबई ते मडगाव विशेष साप्ताहिक रेल्वेगाडी चालविण्यात येणार आहे. यामुळे कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना दिलासा मिळणार आहे.

गाडी क्रमांक ०११०४/०११०३ मडगाव ते लोकमान्य टिळक टर्मिनस ते मडगाव जंक्शन साप्ताहिक विशेष रेल्वेगाडी चालविण्यात येणार आहे. गाडी क्रमांक ०११०४ मडगाव ते लोकमान्य टिळक टर्मिनस साप्ताहिक विशेष रेल्वेगाडी ६ एप्रिल ते ४ मे या कालावधीत दर रविवारी सायंकाळी ४.३० वाजता मडगाव जंक्शन येथून सुटेल. ही गाडी दुसऱ्या दिवशी सकाळी ६.२५ वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस येथे पोहोचेल.

गाडी क्रमांक ०११०३ लोकमान्य टिळक टर्मिनस ते मडगाव साप्ताहिक विशेष रेल्वेगाडी लोकमान्य टिळक टर्मिनस येथून ७ एप्रिल ते ५ मेपर्यंत दर सोमवारी सकाळी ८.२० वाजता सुटेल. ही गाडी मडगाव येथे रात्री ९.४० वाजता पोहोचेल. ही गाडी करमळी, थिवि, सावंतवाडी रोड, कुडाळ, सिंधुदुर्ग, कणकवली, वैभववाडी रोड, राजापूर रोड, विलवडे, आडवली, रत्नागिरी, संगमेश्वर रोड, चिपळूण, खेड, माणगाव, रोहा, पेण, पनवेल आणि ठाणे स्थानकात थांबेल.

logo
marathi.freepressjournal.in