मुंबई-नाशिक महामार्गावर डम्परची कारला धडक

मुंबई - नाशिक महामार्गावर भरधाव वेगाने निघालेल्या एका रेतीच्या डम्परने पुढे असलेल्या कारला जोरदार धडक दिली.
मुंबई-नाशिक महामार्गावर  डम्परची कारला धडक
Published on

ठाणे : मुंबई - नाशिक महामार्गावर भरधाव वेगाने निघालेल्या एका रेतीच्या डम्परने पुढे असलेल्या कारला जोरदार धडक दिली. या अपघातात कारचा चक्काचूर झाला आहे. सुदैवाने चालकासह पाच जण बचावले. ही घटना रविवारी सकाळी सव्वासहा ते साडेसहाच्या सुमारास विवियाना मॉलजवळ घडली. या अपघातामुळे नाशिककडे जाणाऱ्या रस्त्यावरील वाहतुकीवर परिणाम झाला.

कारचालक आणि मालक विशाल मिश्रा हे रविवारी सकाळी कारने आपल्या चार मित्रमंडळींसह मुलुंड येथून कसारा येथे निघाला होता. त्यांची कार मुंबई-नाशिक महामार्गावरील विवियाना मॉलजवळ आल्यावर भरधाव वेगाने मुलुंडकडून कल्याणकडे रेती घेऊन निघालेल्या डम्परने जोरदार धडक दिली. याअपघातात कार रस्त्याच्या डिव्हायडरला जाऊन जोरात धडकल्याने या अपघातात कारचा चक्काचूर झाला. सुदैवाने या अपघातात कारचालक आणि चार प्रवासी असे पाच जण बचावले आहेत. घटनेनंतर घटनास्थळावरून चार जण निघून गेले. अपघातानंतर वाहतूक सुरळीत होण्यास सुरू झाल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन अधिकाऱ्यांनी दिली.

logo
marathi.freepressjournal.in