पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेवर आज आणि उद्या दीड तासांचा ब्लॉक, 'या' वेळेत वाहतूक राहणार बंद

यशवंतराव चव्हाण द्रूतगती मार्गावरील गॅन्ट्रीच्या तांत्रिक तपासणी व दुरुस्तीसाठी महाराष्ट्र राज्य विकास महामंडळामार्फत १८ व १९ मे रोजी दीड तासांचा ब्लॉक
(संग्रहित छायाचित्र)
(संग्रहित छायाचित्र)

मुंबई : यशवंतराव चव्हाण द्रूतगती मार्गावरील गॅन्ट्रीच्या तांत्रिक तपासणी व दुरुस्तीसाठी महाराष्ट्र राज्य विकास महामंडळामार्फत १८ व १९ मे रोजी दीड तासांचा ब्लॉक घेण्यात आला आहे. दोन दिवस सकाळी १०.३० ते दुपारी १२ वाजेपर्यंत ब्लॉक असणार आहे. या काळात वाहतूक बंद राहणार असल्याने प्रवाशांची गैरसोय होणार आहे.

महाराष्ट्र राज्य विकास महामंडळामार्फत पुणे वाहिनीवर गॅन्ट्रीची तांत्रिक तपासणी व दुरुस्तीसाठी शनिवारी सकाळी १०.३० ते दुपारी १२ वाजेपर्यंत वाहतूक बंद राहणार आहे. या कालावधीत द्रूतगती मार्गावरील सर्व वाहने शेडूंग, खोपोली मार्गे राष्ट्रीय महामार्ग क्र. ४८ येथून पुण्याकडे वळविण्यात येणार आहे. तसेच १९ मे रोजी सकाळी १०.३० ते दुपारी १२ वाजेपर्यंत वाहतूक पूर्णपणे बंद करून द्रूतगती मार्गावरील सर्व वाहने कुसगाव पथकर स्थानकावरून राष्ट्रीय महामार्ग क्र. ४८ येथून देहूरोड मार्गे पुण्याकडे वळविण्यात येणार आहे.

त्यानुसार वाहनचालकांनी प्रवासाचे नियोजन करावे. तसेच प्रवासादरम्यान द्रूतगती मार्गावरील वाहनचालकांना काही अडचण असल्यास त्यांनी मदतीसाठी मुंबई-पुणे द्रूतगती मार्गाचा नियंत्रण कक्षाचा दूरध्वनी ९८२२४९८२२४ किंवा महामार्ग पोलीस विभागाच्या ९८३३४९८३३४ या क्रमांकावर संपर्क साधावा.

logo
marathi.freepressjournal.in