मुंबई-पुणे द्रूतगती मार्गावर आज एक तासाचा ब्लॉक; 'या' मार्गांनी करता येणार प्रवास

मुंबई वाहिनीवरील सर्व प्रकारच्या हलक्या व जड, अवजड वाहनांची वाहतूक पूर्णत: बंद करण्यात येणार आहे.
मुंबई-पुणे द्रूतगती मार्गावर आज एक तासाचा ब्लॉक; 'या' मार्गांनी करता येणार प्रवास

मुंबई : महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळामार्फत यशवंतराव चव्हाण मुंबई-पुणे द्रूतगती मार्गावर मुंबईकडे जाणाऱ्या वाहिनीवर गॅन्ट्री बसविण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे. हे काम २३ मे रोजी दुपारी १२ ते दुपारी १ वाजेदरम्यान करण्यात येणार आहे.

या कालावधीत मुंबई वाहिनीवरील सर्व प्रकारच्या हलक्या व जड, अवजड वाहनांची वाहतूक पूर्णत: बंद करण्यात येणार आहे. यामुळे वाहनधारकांना पर्यायी मार्गाने प्रवास करता येणार आहे.

महामंडळामार्फत मुंबई-पुणे द्रूतगती मार्गावर गेल्या काही महिन्यांपासून गॅन्ट्री बसविण्याचे काम सुरू आहे. त्याप्रमाणे गुरुवारी मुंबई वाहिनीवर गॅन्ट्री बसविण्याचे काम करण्यात येणार आहे. यासाठी घेण्यात आलेल्या ब्लॉकमुळे मुंबई वाहिनीवरील सर्व प्रकारच्या हलक्या व जड, अवजड वाहनांची वाहतूक पूर्णत: बंद करण्यात येणार आहे. या कालावधीत वाहनधारकांना पर्यायी मार्गाने प्रवास करता येणार असल्याचे, महामंडळाने कळविले आहे.

- या मार्गांनी करता येणार प्रवास

  • पुणेहुन मुंबईकडे येणारी हलकी वाहने मुंबई वाहिनीवर लेन किमी. ५५.००० वरून वळवून मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४८ या जुना मुंबई-पुणे मार्गावरून करता येतील.

  • पुणेहुन मुंबईकडे येणारी हलकी वाहने व बसेस खोपोली एक्झिट किमी. ३९.८०० येथून वळवून राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४८ जुना पुणे-मुंबई महामार्गावरून खोपोली शहरातून पुढे शेडूंग टोलनाका मार्गे मुंबई वाहिनीवरीन मार्गस्थ करण्यात येतील.

  • पुणेहून मुंबईकडे येणारी हलकी व जड-अवजड वाहने ही खालापूर टोलनाका, शेवटच्या लेनने खालापूर एक्झिट किमी. ३२.५०० येथून वळवून राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४८ जुना पुणे-मुंबई महामार्गावरून खोपोली शहरातून पुढे शेडुंग टोलनाका मार्गे मुंबई वाहिनीवरून मार्गस्थ करण्यात येतील.

  • पुणेहून मुंबईकडे येणारी हलकी व जड-अवजड वाहने ही पनवेल क्रमांक ४८ या मार्गावरून पनवेलमार्गे मुंबई दिशेने मार्गस्थ करण्यात येतील.

  • मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४८ या मार्गावरून पुणे बाजुकडून मुंबई बाजुकडे येणारी वाहने शेडुंग फाट्यावरून सरळ पनवेल दिशेने मार्गस्थ करण्यात येतील.

logo
marathi.freepressjournal.in