Mumbai-Pune Expressway मार्गावर आज २ तासांचा 'ब्लॉक', नका करू 'या' वेळेत प्रवास

मुंबई -पुणे एक्सप्रेस मार्गावरील वाहतूककोंडी टाळण्यासाठी तसेच या मार्गावरून जाणाऱ्या वाहनचालकांची गैरसोय होऊ नये यासाठी महामार्ग वाहतूक पोलिसांनी पर्यायी मार्ग
Mumbai-Pune Expressway मार्गावर आज २ तासांचा 'ब्लॉक', नका करू 'या' वेळेत प्रवास

महामार्ग वाहतूक पोलिसांकडून मुंबई पुणे एक्सप्रेस मार्गावर हायवे ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीम या प्रकल्पातंर्गत टु लेग व थ्री लेग सर्व्हिसिएबल गॅन्ट्री बसविण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. या कामामुळे गुरूवारी, ११ जानेवारी रोजी दुपारी १.३० ते ३.३० वाजेपर्यंत महामार्ग पोलीस केंद्र पळस्पे हद्दीत मुंबई वाहिनीवरील वाहतूक पुर्णत: बंद करण्यात येणार आहे. त्यामुळे या कालावधीत मुंबई -पुणे एक्सप्रेस मार्गावरील वाहतूककोंडी टाळण्यासाठी तसेच या मार्गावरून जाणाऱ्या वाहनचालकांची गैरसोय होऊ नये यासाठी महामार्ग वाहतूक पोलिसांनी पर्यायी मार्ग निश्चित केले आहेत.

हायवे ट्रफिक मॅनेजमेंट सिस्टीम या प्रकल्पातंर्गत नोव्हेंबर २०२३ ते जानेवारी २०२४ या कालावधीत मुंबई पुणे एक्सप्रेस मार्गावरील दोन्ही वाहिनीवर टु लेग व थ्री लेग सर्व्हिसिएबल गॅन्ट्री बसविण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. सदरचे काम मे. प्रोक्टेक सोल्युशन, आय.टी.एम.एस, एल.एल.पी कंपनीतर्फे सदरचे काम करण्यात येत असून, मुंबई पुणे एक्सप्रेस मार्गावर महामार्ग पोलीस केंद्र पळस्पे हद्दीत मुंबईकडे जाणाऱ्या वाहिनींवर गुरुवार ११ जानेवारी रोजी दुपारी टु लेग व थ्री लेग सर्व्हिसिएबल गॅन्ट्री बसविण्याचे काम करण्यात येणार आहे. त्यामुळे या कालावधीत मुंबई पुणे एक्सप्रेस मार्गावर मुंबई लेनवरील सर्व प्रकारच्या वाहनांची वाहतूक बंद करण्याचा निर्णय महामार्ग वाहतूक पोलिसांनी घेतला आहे. याबाबतचे परिपत्रक राज्याचे वाहतूक विभागाचे अपर पोलीस महासंचालक रविंद्र कुमार सिंगल यांनी जारी केले आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in