Mumbai-Pune Railway : बोरघाट विस्कळीतच, ३० रेल्वेगाड्या रद्द

बोरघाट विभागात मोठ्या दरडी कोसळल्यामुळे मुंबई-पुणे रेल्वे मार्ग पुढील काही दिवस विस्कळीत राहणार आहे.
Mumbai-Pune Railway : बोरघाट विस्कळीतच, ३० रेल्वेगाड्या रद्द
Mumbai-Pune Railway : बोरघाट विस्कळीतच, ३० रेल्वेगाड्या रद्द
Published on

मुंबई : बोरघाट विभागात मोठ्या दरडी कोसळल्यामुळे मुंबई-पुणे रेल्वे मार्ग पुढील काही दिवस विस्कळीत राहणार आहे. रेल्वे रुळांचे मोठे नुकसान झाल्यामुळे मध्य रेल्वेने १७ जुलैपर्यंत लांब पल्ल्याच्या ३० आणि आंतरराज्य (इंटरसिटी) गाड्या रद्द केल्याची माहिती अधिकृत सूत्रांनी शुक्रवारी दिली.

मध्य रेल्वेने प्रसिद्ध केलेल्या पत्रकानुसार, डेक्कन क्वीन, डेक्कन एक्स्प्रेस, मुंबई-पुणे इंटरसिटी एक्स्प्रेस, सीएसएमटी-हैदराबाद एक्स्प्रेस, चेन्नई एगमोर सुपरफास्ट मेल आणि हुबळी-दादर एक्स्प्रेस या १७ जुलैपर्यंत रद्द आहेत. ठरावीक तारखांच्या गाड्या महालक्ष्मी एक्सप्रेस, जोधपूर-हडपसर एक्सप्रेस, दादर-सातारा एक्सप्रेस आणि दादर-साईनगर शिर्डी एक्सप्रेस या ठरावीक दिवसांच्या गाड्यांचाही यात समावेश आहे. आहेत. तर मुंबई आणि पुण्याला गोरखपूर, गाझीपूर सिटी आणि हजरत निजामुद्दीनशी जोडणाऱ्या अनेक विशेष गाड्याही रद्द करण्यात आल्या आहेत.

Mumbai-Pune Railway : बोरघाट विस्कळीतच, ३० रेल्वेगाड्या रद्द
Lonavala-Karjat Landslide : मुंबई-पुणे मार्गावरील रेल्वे वाहतुकीवर परिणाम; १७ जुलैपर्यंत अनेक गाड्या रद्द, वाचा संपूर्ण यादी

मुंबई-पुणे मार्गावरील या कठीण भोर घाट (खंडाळा घाट) भागात एकूण तीन रेल्वे ट्रॅक आहेत — अप लाईन (मुंबईकडे जाणारी), डाऊन लाईन (पुण्याकडे जाणारी) आणि एक मिडल लाईन (मध्य रेल्वे लाईन). अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, काही दुर्गम ठिकाणी बांधकाम साहित्य पोहोचवणे हे मोठे आव्हान ठरत आहे.

रेल्वेची पथके लवकरात लवकर मार्ग सुरू करण्यासाठी जिल्हा प्रशासन आणि वन विभागाशी सातत्याने समन्वय साधत आहेत. सद्यस्थितीत तीनपैकी एक रेल्वे लाईन पूर्ववत करण्यात यश आले असून, उर्वरित दोन लाईन्सवर काम वेगाने सुरू आहे.

(इंग्रजीत वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in