
तांत्रिक बिघाड झाल्यामुळे ही वाहतूक विस्कळीत झाल्याची प्राथमिक माहिती देण्यात आली आहे. परिणामी या मार्गावरील गाड्या २० ते २५ मिनिट उशिराने धावत आहेत. याबाबत रेल्वे प्रशासनाकडून माहिती देण्यात आली आहे.
वाहतूक विस्कळीत झाल्यामुळे पनवेल रेल्वे स्थानकावर नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली आहे. हार्बरचं वेळापत्रक कोलमडल्यामुळे नागरिकांचे प्रचंड हाल होत आहेत. तांत्रिक बिघाड झाल्यामुळे ही संपूर्ण वाहतूक विस्कळीत झाल्याचं सांगण्यात येत आहे. लोकल सेवा विस्कळीत झाल्याने सकाळी कामावर जाण्याच्या गडबडीत असणाऱ्या चाकरमान्यांना मोठा फटका बसला. तसंच अनेक नागरिकांनी पर्यायी वाहतूक साधनांचा अवलंब केल्याचं पाहायला मिळालं.