

पुणे : एका २८ वर्षीय तरुणीसोबत प्रेमसंबंध निर्माण करून तिच्यावर अत्याचार केल्याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षकाविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संबंधित उपनिरीक्षकाने या तरुणीकडून वेळोवेळी वेगवेगळी कारणे सांगत दहा ते बारा लाख रुपये उकळतानाच तिला पत्नी म्हणून नांदवण्यास नकार दिल्याचे तसेच तिचा गर्भपात करून तिला जातीवाचक शिवीगाळ केल्याचा प्रकारही उघडकीस आला आहे. तिने दिलेल्या तक्रारीनुसार पोलीस उपनिरीक्षक विराज गावडे (३२), त्याचा भाऊ कुणाल गावडे तसेच वडील गजानन गावडे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी पोलिस उपनिरीक्षक विराज गावडेची २०२० मध्ये पीडित तरुणीसोबत ओळख झाली व त्यांच्यात प्रेमसंबंध निर्माण झाले. दोघांनी नोंदणी पद्धतीने विवाह देखील केला. विराजने तरुणीकडून वेळोवेळी विविध कारणे सांगत १० ते १२ लाख रुपये घेतले आणि तिच्याशी त्याने शारीरिक संबंध ठेवले.