नगरपरिषद व नगर पंचायतीच्या पोटनिवडणुका; ११ ऑगस्टला मतदान

नगर पंचायत आणि नगरपरिषदेच्या ११ जागांवर पोटनिवडणुका पार पडणार आहेत.
नगरपरिषद व नगर पंचायतीच्या पोटनिवडणुका; ११ ऑगस्टला मतदान
@ANI
Published on

मुंबई : नगर पंचायत आणि नगरपरिषदेच्या ११ जागांवर पोटनिवडणुका पार पडणार आहेत. ११ सदस्यांच्या रिक्त जागांसाठी आणि कोल्हापूर जिल्हा हातकणंगले नगर पंचायतीच्या अध्यक्ष पदाच्या रिक्त जागेच्या पोटनिवडणुकीसाठी ११ ऑगस्ट रोजी मतदान होणार असल्याचे राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केले आहे.

विधानसभा निवडणुकीपूर्वी नगरपरिषद आणि पंचायत समितीच्या पोटनिवडणुका पार पडणार आहेत. या निवडणुकीत विजय मिळवण्यासाठी सर्वपक्षीय नेत्यांनी मोर्चेबांधणी केली आहे. खालापूर, पाली (जि. रायगड), निफाड, सुरगाणा (जि. नाशिक), बोदवड (जि. जळगाव), धडगाव-वडफळ्या-रोषमाळ बु. (जि. नंदुरबार), कवठेमहांकाळ, खानापूर (जि. सांगली), चंदगड (जि. कोल्हापूर) आणि बाभुळगाव (जि. यवतमाळ) या नगरपंचायतींच्या सदस्यपदांच्या प्रत्येकी एका रिक्त जागेसाठी मतदान होईल. त्याचबरोबर कन्हान-पिपरी (जि. नागपूर) नगरपरिषदेच्या सदस्यपदाच्या एका रिक्त जागेसाठीदेखील मतदान होणार आहे.

नामनिर्देशनपत्रे २४ जुलैपर्यंत स्वीकारली जातील. रविवारी सुट्टीच्या दिवशी मात्र नामनिर्देशनपत्र स्वीकारण्यात येणार नाहीत. २५ जुलै रोजी नामनिर्देशनपत्रांची छाननी होईल. ११ ऑगस्ट रोजी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत मतदान होईल. १२ ऑगस्ट रोजी मतमोजणी होईल, असेही राज्य निवडणूक आयोगाच्या प्रसिद्धिपत्रकात नमूद करण्यात आले आहे.

logo
marathi.freepressjournal.in