शिकारीच्या उद्देशाने आलेल्या दोघांना शस्त्रांसह अटक; मुरूड पोलिसांची कारवाई; दोन रायफल, १०४ जिवंत काडतुसे जप्त

मुरूड तालुक्यातील तेलवडे ग्रामपंचायत हद्दीतील टक्का आदिवासी वाडीलगतच्या जंगल परिसरात शिकारीच्या उद्देशाने आलेल्या दोघांना मुरूड पोलिसांनी शस्त्रांसह ताब्यात घेतले. त्यांच्याकडून दोन रायफल, १०४ जिवंत काडतुसे आणि वन्यजीवांची शिकार करण्यासाठी वापरली जाणारी हत्यारे जप्त करण्यात आली आहेत.
शिकारीच्या उद्देशाने आलेल्या दोघांना शस्त्रांसह अटक; मुरूड पोलिसांची कारवाई; दोन रायफल, १०४ जिवंत काडतुसे जप्त
शिकारीच्या उद्देशाने आलेल्या दोघांना शस्त्रांसह अटक; मुरूड पोलिसांची कारवाई; दोन रायफल, १०४ जिवंत काडतुसे जप्त
Published on: 

मुरूड-जंजिरा : मुरूड तालुक्यातील तेलवडे ग्रामपंचायत हद्दीतील टक्का आदिवासी वाडीलगतच्या जंगल परिसरात शिकारीच्या उद्देशाने आलेल्या दोघांना मुरूड पोलिसांनी शस्त्रांसह ताब्यात घेतले. त्यांच्याकडून दोन रायफल, १०४ जिवंत काडतुसे आणि वन्यजीवांची शिकार करण्यासाठी वापरली जाणारी हत्यारे जप्त करण्यात आली आहेत.

या परिसरात काही व्यक्ती शिकारीसाठी येणार असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचला. यावेळी पांढऱ्या रंगाची गाडी संशयास्पदरीत्या दिसल्याने तिची तपासणी करण्यात आली.

शिकारीच्या उद्देशाने आलेल्या दोघांना शस्त्रांसह अटक; मुरूड पोलिसांची कारवाई; दोन रायफल, १०४ जिवंत काडतुसे जप्त
संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात शिकारीचा रक्तरंजित थरार! गोळी लागून एकाचा मृत्यू, दोघे जखमी, मृतदेहाची परस्पर लावली विल्हेवाट

त्यात एक सिंगल बोअर आणि एक डबल बोअर रायफल, जिवंत काडतुसे तसेच शिकारीची हत्यारे आढळली. या प्रकरणी चेंबूर, मुंबई येथील क्रेसेन्ट लुकस डिमेलो (५९) आणि ग्राफिक क्रेसेन्ट डिमेलो (२३) यांना ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

(इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in