
वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडर यांनी आज पुण्यात महात्मा फुले यांच्या स्मृतीला अभिवादन केलं. महात्मा फुले यांनी जो लढा सुरु केला त्याची फळे आपण चाखतो आहोत, असं ते म्हणाले. यावेळी त्यांनी भाजपवर टीका करत राज्यात ३ डिसेंबरनंतर अनेक ठिकाणी दंगलीची शक्यता असल्याचं वक्तव्य केलं. धार्मिक हस्तक्षेप होत आहे. आमच्या वैदिक धर्मावर आघात होत आहे. असा ज्यांनी कांगावा केला होता. त्यांनी आता देशात हिंदूंचं राज्य असून देशाला हिंदूराष्ट्र करावं, संबोधित करावं, असा नवीन कांगावा सुरु केला आहे. याचे गांभीर्य कुणाच्या लक्षात आलं नसेल पण पुन्हा देशाच्या वैदिक पंरपरा सुरु कराव्या. संविधान बदलणार अशी घोषणा केली जात आहे. प्रकाश आंबेडकर म्हणाले.
याविषयी बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणाले की, आरएसएस, विश्व हिंदू परिषद यावर बोलत नाही आहे. पण देवेंद्र फडणवीस यांना संघाच्या कार्यकारणीत प्रांत प्रतिनिधी पदारर्यंत जाता आलं नाही. ते आज सांगतात मी असताना संविधान बदलणार नाही. माझ्या मते रस्त्यावरील माणूस कितीही ओरडला तर त्याच्यावर कुणीही विश्वास ठेवत नाही. देवेंद्र फडणवीस यांना आव्हान आहे. जे ते बोललेत ते मोहन भागवत यांनी स्पष्ट करावं, असं देखील प्रकाश आंबेडकर म्हणाले.
ते पुढे बोलतना म्हणाले की, राज्यात ३ डिसेंबनंतर अनेक ठिकाणी दंगलीची शक्यता आहे. प्रत्येक पोलीस स्टेशनला सतर्क करण्यात आलं आहे. कुठल्याही परिस्थितीत ६ डिसेंबरनंतर काहीही घडू शकतं, अशी सुचना पोलिसांना देण्यात आली आहे. चार राज्यातील निवडणूका झाल्यानंतर घडेल. देशात मुस्लिम आणि ओबीसी आरक्षण टार्गेट केलं जात आहे. ओबीसींनी सतर्क राहावं, असं देखील प्रकाश आंबेडकर म्हणाले.