माईर्स एमआयटीतर्फे महाराष्ट्रातील पंचकन्याना जीवनगौरव पुरस्कार जाहीर

माईर्स एमआयटीतर्फे महाराष्ट्रातील पंचकन्याना  जीवनगौरव पुरस्कार जाहीर

विश्वशांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटी, पुणेतर्फे पूर्णब्रह्मयोगिनी प्रयागअक्का कराड यांच्या नवव्या स्मृतिदिनानिमित्त आयुष्यभर समाजप्रबोधन करणाऱ्या महाराष्ट्रातील पंचकन्याना ‘पूर्णब्रह्मयोगिनी त्यागमूर्ती श्रीमती प्रयागअक्का कराड समर्पित जीवनगौरव पुरस्कार’ जाहीर करण्यात आला आहे.

संत साहित्याच्या गाढ्या अभ्यासक व पुणे येथील पुण्यधाम आश्रमाच्या अध्यक्षा माता कृष्णा कश्यप, ज्येष्ठ समाजसेविका शशिकला भिकाजी केंद्रे, स्त्री रोगतज्ज्ञ व ज्येष्ठ समाजसेविका डॉ. तेजस्विनी जनार्दन वाडेकर, निवृत्त प्राचार्या डॉ. ललिता शरद (नानासाहेब) गुप्ते आणि ज्येष्ठ समाजसेविका लक्ष्मीबाई महादु शेळके यांचा समावेश आहे.

सन्मानपत्र, स्मृतिचिन्ह, सुवर्णपदक व रोख रु. २१,०००/- (रुपये एकवीस हजार) असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. हा पुरस्कार प्रदान सोहळा शुक्रवार, दि. २७ मे २०२२ रोजी, सकाळी १०.३० वा. मानवतातीर्थ म्हणून ओळखल्या जाणार्‍या रामेश्वर (रूई), ता.जि. लातूर येथे संपन्न होणार आहे.

या समारंभासाठी लोकसभेचे माजी सभापती शिवराज पाटील चाकुरकर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. नालंदा विद्यापीठाचे कुलपती व जगप्रसिद्ध संगणकजत्ज्ञ डॉ. विजय भटकर हे विशेष सन्माननीय पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. अध्यक्षस्थानी एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. विश्वनाथ दा. कराड असतील, अशी माहिती माईर्स एमआयटी शिक्षण संस्था समूहाचे व्यवस्थापकीय विश्वस्त व कार्याध्यक्ष राहुल विश्वनाथ कराड यांनी दिली.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in