Mysterious Discovery: मुंबईच्या लोकल ट्रेनमध्ये सापडली २० लाखांची रोकड असलेली 'बेवारस बॅग'

रविवारी रात्री आसनगाव स्थानकातून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) कडे निघालेल्या ९.५७ च्या लोकल ट्रेनमधील मधल्या जनरल डब्यामध्ये प्रवाशाला निळ्या रंगाची बेवारस बॅग दिसली.
Mysterious Discovery: मुंबईच्या लोकल ट्रेनमध्ये सापडली २० लाखांची रोकड असलेली 'बेवारस बॅग'
Published on

मुंबईची लाईफलाईन समजल्या जाणाऱ्या लोकल ट्रेनमध्ये रविवारी रात्री एका प्रवाशाला बेवारस बॅग सापडली असून त्या बॅगमध्ये तब्बल २० लाख रुपयांची रोकड आढळून आली आहे. आसनगाव स्थानकातून सीएसएमटीकडे निघालेल्या लोकलमध्ये ही बॅग सापडली. या बॅगेच्या मूळ मालकाचा शोध कल्याण लोहमार्ग पोलीस घेत आहेत.

माहितीनुसार, रविवारी रात्री आसनगाव स्थानकातून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) कडे निघालेल्या ९.५७ च्या लोकल ट्रेनमधील मधल्या जनरल डब्यामध्ये प्रवाशाला निळ्या रंगाची बेवारस बॅग दिसली. याबाबत प्रवाशाने तक्रार केल्यानंतर कल्याण जीआरपीने बॅगेची तपासणी केली असता त्यामध्ये २० लाख रुपयांची रोकड आढळून आली.

रिबॉक कंपनीच्या या बॅगमध्ये २० लाख रुपयांसह (५०० रुपयांच्या नोटांचे ७ बंडल) एक औषधांचे चार कप्पे असलेला बॉक्सही आढळून आला आहे. ही बॅग कोणी विसरलं की मुद्दाम सोडून गेलं आहे, याबाबत अद्याप काहीही माहिती नाही. कल्याण लोहमार्ग पोलिसांनी पंचनाम्याद्वारे बॅग जप्त केली असून मूळ मालकाचा शोध सुरू केला आहे.

logo
marathi.freepressjournal.in