धक्कादायक! नागपुरात एकाच कुटुंबातील चौघांची आत्महत्या

तीन मृतदेह हे हातपाय बांधलेल्या स्थितीत आढळले, तर एक मृतदेह गळफास घेतलेल्या स्थितीत आढळून आला. त्यामुळे तिघांचे हातपाय बांधून त्यांना फाशी दिल्यानंतर चौथ्या व्यक्तीने स्वतः गळफास घेतल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
धक्कादायक! नागपुरात एकाच कुटुंबातील चौघांची आत्महत्या
प्रातिनिधिक प्रतिमा
Published on

नागपूर : नागपुरात एकाच कुटुंबातील चार जणांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. नरखेड येथील मोवाड गावात विजय पचोरी हे सेवानिवृत्त शिक्षक सहकुटुंब राहत होते. त्यांनी आपली पत्नी व दोन मुलांसह गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे बुधवारी सकाळी उजेडात आले.

पचोरी कुटुंबाने हे टोकाचे पाऊल का उचलले? हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. पण या घटनेमुळे नागपूरमध्ये खळबळ माजली आहे. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन चारही मृतदेह ताब्यात घेतले आहेत. पोलिसांचे न्यायवैद्यक पथक घटनास्थळी पोहोचले असून याप्रकरणी चौकशी करण्यात येत आहे.

तीन मृतदेह हे हातपाय बांधलेल्या स्थितीत आढळले, तर एक मृतदेह गळफास घेतलेल्या स्थितीत आढळून आला. त्यामुळे तिघांचे हातपाय बांधून त्यांना फाशी दिल्यानंतर चौथ्या व्यक्तीने स्वतः गळफास घेतल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. विजय पचोरी (६८), त्यांच्या पत्नी मालाबाई पचोरी (५५), मुलगा दीपक पचोरी (३८) व गणेश पचोरी (३६) अशी मृतांची नावे आहेत.

सोसायटी बुडाल्याने उचलले टोकाचे पाऊल?

विजय पचोरी यांनी एक सोसायटी उघडली होती. त्यामध्ये अनेकांनी पैसे गुंतवले होते. मात्र, ती सोसायटी बुडाली. त्यामुळे घरी येऊन अनेकांनी पैशासाठी तगादा लावला होता. काही गुंतवणूकदारांनी पोलिसांत तक्रारही केली होती. त्यामुळे पोलिसांनी विजय यांचा मुलगा गणेशला अटकसुध्दा केली होती. तो नुकताच कारागृहातून सुटून आला होता. त्यातच न्यायालयाने त्यांची संपत्ती जप्त करण्याचे आदेश दिल्याने हे कुटुंब गेले काही दिवस तणावात होते. यातून घरात पती आणि पत्नीमध्ये वाद होत होते. त्यातून त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले असावे, असा अंदाज वर्तवला जात आहे.

logo
marathi.freepressjournal.in