नागपूरात मविआची दुसरी वज्रमूठ सभा; पण चर्चा मात्र नाराजी आणि गैरहजर नेत्यांच्या...

आज नागपूरमध्ये महाविकास आघाडीची दुसरी वज्रमूठ सभा होणार असून या सभेकडे लक्ष लागले आहे ते नाराजी आणि गैरहजेरी नेत्यांच्या चर्चांमुळे...
नागपूरात मविआची दुसरी वज्रमूठ सभा; पण चर्चा मात्र नाराजी आणि गैरहजर नेत्यांच्या...

आज नागपूरमध्ये महाविकासआघाडीची दुसरी वज्रमूठ सभा होत असून या सभेसाठी उद्धव ठाकरेंसह, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे अनेक नेते, कार्यकर्त्ये नागपूरत दाखल झाले आहेत. मात्र, या सभेमध्ये कोण काय बोलणार यापेक्षा अधिक चर्चा या कोण हजर राहणार? याकडे आहे. तसेच, काही दिवसांपासून अजित पवार हे माविआमध्ये नाराज असल्याच्यादेखील चर्चांना उधाण आले आहे. पण तेही या सभेत हजर राहणार असून त्यांना बोलू दिले जाणार नसल्याची जास्त चर्चा आहे.

गेलेलं काही दिवस राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विरोधी पक्षनेते अजित पवार हे महाविकास आघाडीमध्ये नाराज असल्याच्या चर्चा आहेत. तसेच, या सभेमध्ये त्यांना बोलू दिले जाणार नसल्याचेही सांगितले जात होते. यावर बोलताना स्वतः अजित पवार म्हणाले की, "आज नागपूरमध्ये होणाऱ्या सभेत, मी भाषण करणार की नाही? असे प्रश्न विचारले जात आहेत. तर, मविआच्या अशा अनके सभा पुढे होणार आहेत. त्यामुळे प्रत्येक सभेमध्ये पक्षाचे २ नेते बोलणार आहेत, असेच आमचे ठरलेले आहे. त्यामुळे मागच्या सभेत राष्ट्रवादीकडून मी आणि धनंजय मुंडे यांनी भाषण केले होते. तर आज जयंत पाटील जे पक्षाचे प्रांताध्यक्ष आहेत आणि नेते अनिल देशमुख, जे विदर्भातील एक प्रमुख नेते असून हे दोघे भाषण करणार आहेत." असे त्यांनी स्पष्ट केले.

याशिवाय, काँग्रेसचे नेते या सभेमध्ये अनुपस्थित राहणार आहेत. काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण हे या सभेसाठी उपस्थित राहणार नाहीत. त्यांनी ट्विट करत ही माहिती दिली आहे. ते म्हणाले की, "नांदेड जिल्ह्यामधील स्थानिक निवडणुकांची पूर्वतयारी सुरू आहे. त्यामुळे आज नागपूरमध्ये होणाऱ्या महाविकासआघाडीच्या वज्रमूठ सभेला उपस्थित राहणे शक्य होणार नाही. आघाडीच्या प्रमुख नेत्यांना मी याबाबत पूर्वकल्पना दिली आहे," असे स्पष्टीकरण दिले आहे. तर आज नाना पटोले आणि सुनील केदार हे आज काँग्रेसतर्फे भाषण कारणात आहेत.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in