जळगावकरांसाठी जलद-आरामदायी पुणे प्रवास; नागपूर-पुणे वंदे भारत एक्स्प्रेसचे जंगी स्वागत

विदर्भ, खान्देश आणि पश्चिम महाराष्ट्राला जोडणारा एक ऐतिहासिक क्षण रविवारी प्रत्यक्षात उचाडला. नागपूर-पुणे वंदे भारत एक्स्प्रेसला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे हिरवा झेंडा दाखवून या सेवेचा शुभारंभ केला.
जळगावकरांसाठी जलद-आरामदायी पुणे प्रवास; नागपूर-पुणे वंदे भारत एक्स्प्रेसचे जंगी स्वागत
Photo : X (@RaviDadaChavan)
Published on

जळगाव : विदर्भ, खान्देश आणि पश्चिम महाराष्ट्राला जोडणारा एक ऐतिहासिक क्षण रविवारी प्रत्यक्षात उचाडला. नागपूर-पुणे वंदे भारत एक्स्प्रेसला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे हिरवा झेंडा दाखवून या सेवेचा शुभारंभ केला. या गाडीच्या मार्गात भुसावळ आणि जळगाव या दोन महत्त्वाच्या स्थानकांचा समावेश असल्याने, जळगाव जिल्ह्यातील प्रवाशांसाठी पुण्याचा प्रवास आता अधिक जलद, आरामदायी आणि आधुनिक होणार आहे.

नागपूरहून पुण्याकडे निघालेल्या या गाडीचे भुसावळ आणि जळगाव रेल्वे स्थानकांवर मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात स्वागत करण्यात आले. भुसावळ स्थानकावर केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी गाडीला हिरवा झेंडा दाखवला. तर जळगाव स्थानकावर खासदार उज्ज्वल निकम, खासदार स्मिता वाघ आणि आमदार सुरेश भोळे यांच्यासह जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी गाडीचे स्वागत केले. स्थानके फुलांच्या माळा आणि पताकांनी सजवण्यात आली होती, आणि या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी प्रवासी, विद्यार्थी व नागरिकांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती.

या नवीन वंदे भारत सेवेमुळे धार्मिक स्थळे, व्यापार, पर्यटन आणि रोजगाराच्या संधींना मोठी चालना मिळणार असून, विदर्भ, खान्देश आणि पश्चिम महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासाला गती मिळेल, असा विश्वास मान्यवरांनी व्यक्त केला.

logo
marathi.freepressjournal.in