Nagpur : नॉट रिचेबल सतीश इटकेलवारांचे राष्ट्रवादीकडून निलंबन; नागपूरमध्ये तिहेरी लढत

राज्यात पदवीधर निवडणुकीवरून चांगलेच राजकारण तापले असून राष्ट्रवादीने नागपूर (Nagpur) मतदारसंघात मोठी कारवाई केली
Nagpur : नॉट रिचेबल सतीश इटकेलवारांचे राष्ट्रवादीकडून निलंबन; नागपूरमध्ये तिहेरी लढत

एकीकडे नाशिक पदवीधर मतदारसंघातील राजकारणामुळे वातावरण तापले असतानाच नागपूरमध्येही मोठी घडामोड पाहायला मिळाली. नागपूर (Nagpur) पदवीधर मतदारसंघात अर्ज दखल केलेले सतीश इटकेलवार (Satish Itkelwar) यांच्यावर राष्ट्रवादी काँग्रेसने (NCP) मोठी कारवाई केली. नागपूरमध्ये महाविकास आघाडीचा उमेदवार असतानाही त्यांनी अर्ज मागे न घेतल्यामुळे त्यांचे निलंबन करण्यात आले. सतीश इटकेलवार यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज भरला होता. त्यानंतर आज ही कारवाई करण्यात आली आहे.

नेमकं प्रकरण काय?

सतीश इटकेलवार हे राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी ओबीसी सेलचे नेते आहेत. नागपूर पदवीधर मतदारसंघात महाविकास आघाडीकडून आधीच अधिकृत उमेदवार जाहीर करण्यात आला होता. तरीही, सतीश इटकेलवार यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यानंतर आज पक्षाकडून अर्ज मागे घेण्याचे आदेशदेखील देण्यात आले. मात्र, आज उमेदवारी मागे घेण्याचा शेवटचा दिवस असताना ते नॉट रिचेबल झाले. त्यांनी अर्ज मागे न घेतल्याने राष्ट्रवादी काँग्रेसनी ही कारवाई केली. त्यामुळे आता नागपूर पदवीधर मतदारसंघात तिहेरी लढत पाहायला मिळणार आहे. या निवडणुकीत सतीश इटकेलवार, राजेंद्र झाडे आणि सुधाकर अडबाले यांच्यात तिहेरी लढत होणार आहे.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in