शिक्षक की विकृत! शौचालयाच्या खिडकीतून रेकॉर्ड करायचा महिलांचे व्हिडिओ; झाली अटक

एका महिलेच्या हे लक्षात आल्यानंतर त्यांनी आयोजकांना याबाबतची माहिती दिल्याने ही बाब समोर आली. यानंतर अंबाझरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विनायक गोऱ्हे आणि त्यांच्या पथकाने सीसीटीव्ही...
शिक्षक की विकृत! शौचालयाच्या खिडकीतून रेकॉर्ड करायचा महिलांचे व्हिडिओ; झाली अटक

राज्याच्या उपराजधानीत शिक्षकी पेशाला काळीमा फासणारी घटना घडली आहे. नागपूर येथे पार पडलेल्या तीन दिवसीय 'अ‍ॅडव्हांटेज विदर्भ' या कार्यक्रमात महिला शौचालयात छुप्या पद्धतीने चित्रिकरण केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. धक्कादायक म्हणजे हा प्रकार एका शिक्षकाने केला आहे. मंगेश विनायकराव खापरे(37) असे शिक्षकाचे नाव असून तो नागपूरच्या कासरपूरा भागातील रहिवासी आहे. पोलिसांनी त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करुन त्याला अटक केली आहे.

नागपुरातील विद्यापीठ परिसरात तीन दिवसीय 'अ‍ॅडव्हांटेज विदर्भ' कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सोमवारी या कार्यक्रमाचा समारोप झाला. या कार्यक्रमात एका खासगी शाळेच्या शिक्षकाला मुख्यद्वाराचे डिझाईन करण्याचे काम दिले होते. या शिक्षकाने कार्यक्रमातील महिला शौलायाच्या खिडकीतून व्हिडिओ चित्रिकरण केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. एका महिलेच्या हे लक्षात आल्यानंतर त्यांनी आयोजकांना याबाबतची माहिती दिल्याने ही बाब समोर आली. यानंतर अंबाझरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विनायक गोऱ्हे आणि त्यांच्या पथकाने सीसीटीव्ही फुटेज तपासले असता आरोपी खापरे हा दिसून आला.

या शिक्षकाने तीन दिवसाच्या कार्यक्रमात 12 महिलांचे व्हिडिओ चित्रीत केले आहेत. त्यातील काही व्हिडिओ त्याने डिलीट केले होते. तसेच, या शिक्षकाने या आधी सार्वजनिक शौचालयात देखील असे प्रकार केल्याचे समोर आले आहे. चौकशीदरम्यान त्याच्या मोबाईलमध्ये 2022 सालापासून चित्रित केलेले 30 व्हिडिओ आढळून आले आहेत. हा शिक्षक मानसिक रोगी असल्याची शक्यता अधिकाऱ्यांनी वर्तवली आहे.

दरम्यान, मंगेश खापरे याला अटक केल्यानंतर त्याला स्थानिक न्यायालयात दाखल करण्यात आले असून त्याला आज (मंगळवार) जामीनावर सोडण्यात आले.

logo
marathi.freepressjournal.in