Namdevrao Jadhav: पुण्यात राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमक; नामदेवराव जाधवांना फासलं काळं

भांडारकर इन्स्टि्यूट इथं कार्यक्रमासाठी परवानगी नाकारल्यानंतर त्यांच्यावर हा प्रसंग ओढावला आहे.
Namdevrao Jadhav: पुण्यात राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमक; नामदेवराव जाधवांना फासलं काळं

मराठा समाजाला आरक्षण देण्यावरुन शरद पवारांवर टीका करणाऱ्या नामदेवराव जाधव यांना काळ फासण्याचा प्रकार पुण्यात घडला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी हे कृत्य केलं आहे. पवारांवर वारंवार टीका केल्यामुळे हे कृत्य केल्याचं या कार्यकर्त्यांनी म्हटलं आहे. भांडारकर इन्स्टि्यूट इथं कार्यक्रमासाठी परवानगी नाकारल्यानंतर त्यांच्यावर हा प्रसंग ओढावला आहे.

नामदेवराव जाधव हे पुण्यात पत्रकार भवनाजवळ पत्रकारांशी संवाद साधताना राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्यावर शाही फेकली आहे. आक्रमक झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी थेट जवळ जाऊन जाधव यांच्या तोंडाला शाही फासली आहे. यानंतर त्यांच्या सुरक्षा रक्षकांनी जाधवांभोवती कडं केलं. पण तरीही कार्यकर्ते जाधव यांच्यावर धाऊन जात होते. यावेळी हे कृत्य करणाऱ्या कार्यकर्त्यांकडून शरद पवार जिंदाबाद अशा घोषणा दिल्या जात होत्या.

नामदेवराव जाधव हे शरद पवार साहेबांविरोधात वारंवार विधानं करत आहेत. आमच्यावर कारवाई झाली तरी चालेल. हे कोणीतरी सोडलेले पिल्लू आहे. यापूर्वी हा व्यक्ती शरद पवारांच्या पाया पडायला यायचा. त्यांनी पुस्तकं द्यायला यायचा. त्यामुळे शरद पवारांविरोधात या व्यक्तीनं वेडीवाकडी विधानं केलेली खपवून घेतली जाणार नाहीत, अशी प्रतिक्रिया हे कृत्य करणाऱ्या कार्यकर्त्यांनी दिली आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in