नाना पाटेकरांच्या ‘नाम फाऊंडेशन’मुळे धोंदलगाव टँकरमुक्त; गावकऱ्यांकडून आठवणींना उजाळा

या गावात पावसाळा संपून दिवाळी जवळ आली की, दरवर्षी टँकरने पाणीपुरवठा करावा लागायचा, अशी माहिती नदीतज्ज्ञ आनंद असोलकर यांनी दिली.
नाना पाटेकरांच्या ‘नाम फाऊंडेशन’मुळे धोंदलगाव टँकरमुक्त; गावकऱ्यांकडून आठवणींना उजाळा
नाना पाटेकरांच्या ‘नाम फाऊंडेशन’मुळे धोंदलगाव टँकरमुक्त; गावकऱ्यांकडून आठवणींना उजाळा
Published on: 

मराठवाड्यातील ‘धोंदलगाव’ नाना पाटेकर व मकरंद अनासपुरे यांच्या ‘नाम फाऊंडेशन’ने दत्तक घेतले होते. या गावात जलसंधारणसाठी निधी देऊन ते गाव दुष्काळमुक्त बनवण्यात आले.

‘नाम फाऊंडेशन’ने २०१६ मध्ये वैजापूर तालुक्यातील ‘धोंदलगाव’ हे गाव दत्तक घेतले होते. या गावात पावसाळा संपून दिवाळी जवळ आली की, दरवर्षी टँकरने पाणीपुरवठा करावा लागायचा, अशी माहिती नदीतज्ज्ञ आनंद असोलकर यांनी दिली.

निजाम काळात हे गाव गोठ्यांबद्दल आणि संत्र्यांसाठी प्रसिद्ध होते, ज्या जवळच्या करंजगाव रेल्वे स्थानकावरून देशाच्या इतर भागांत पाठवल्या जायच्या. परंतु, स्थानिक नदीवरील बंधाऱ्यांमध्ये गाळ साचल्यामुळे, मोसंबीची झाडे जोपासणे किंवा वर्षातून एकापेक्षा जास्त पिके घेणे शक्य नव्हते.

‘नाम फाऊंडेशन’च्या स्थापनेनंतर मकरंद अनासपुरे आणि नाना पाटेकर एका अशा गावाच्या शोधात होते जिथे जलसंधारण प्रकल्प राबवता येईल... मी त्यांना धोंदलगावबद्दल सांगितले... ते २ ऑक्टोबर २०१५ रोजी येथे आले आणि त्यांनी या कामाचे उद्घाटन केले, असे असोलकरांनी ‘पीटीआय’ला सांगितले.

गावातील १२ बंधारे होते आणि ते पूर्णपणे गाळाने भरलेले होते. त्यामुळे तिथे पाणी साचत नव्हते. ग्रामस्थांनीही या कामात हातभार लावला आणि आम्ही ४.५ किमी लांबीच्या पट्ट्यातील गाळ उपसला. यामुळे जवळपास २० कोटी लिटर पाणी साठवण्याची क्षमता निर्माण झाली. यामुळे गावाची अर्थव्यवस्थाच बदलली, असे असोलकर म्हणाले.

येथील जवळपास ७० टक्के शेतकरी आता वर्षातून दोन पिके घेतात; काही जण तर तीन पिकेही घेतात. २०१६ पासून आजतागायत हे गाव टँकरमुक्त राहिले आहे, अपवाद फक्त २०१८ मधील काही महिन्यांचा, जेव्हा तीव्र दुष्काळ पडला होता,’ असे ते म्हणाले.

स्थानिक कार्यकर्ते राहुल साबळे म्हणाले की, पाणी उपलब्ध झाल्यामुळे दुग्धव्यवसायालाही चालना मिळाली. हे गाव आता दररोज १० हजार लिटरपर्यंत दूध उत्पादन करते, जे जिल्ह्यातील सर्वाधिक दूध उत्पादनांपैकी एक आहे. या दुग्धव्यवसायामुळे जवळपास ८०० स्थानिक तरुणांना रोजगार मिळाला आहे.

नानांनी गाव दत्तक घेतल्यानंतर लोकांचा आमच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोनच बदलला. राजकारण्यांनीही आमच्या गावाच्या विकासाला प्राधान्य देण्यास सुरुवात केली. हे काम पूर्ण झाल्यापासून येथे एकाही शेतकऱ्याने आत्महत्या केलेली नाही, हे सांगताना मला अभिमान वाटतो, असे साबळे म्हणाले.

गावाचे सरपंच भारत आवारे म्हणाले की, वारंवार पडणाऱ्या दुष्काळामुळे ग्रामस्थांमध्ये नकारात्मक मानसिकता निर्माण झाली होती. परंतु, ‘नाम फाऊंडेशन’च्या नेतृत्वाखाली झालेल्या जलसंधारण प्रकल्पाने सर्व काही बदलून टाकले.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in