नाना पटोलेंनी राज्य सरकारच्या हिंदुत्वावर केली टीका

हिंदूंचे सरकार आले आणि आनंदाने सण साजरे करणाऱ्यांच्या राज्यात हिंदू शेतकरी मदतीपासून वंचित असल्याची टीका काँग्रेसने केली
नाना पटोलेंनी राज्य सरकारच्या हिंदुत्वावर केली टीका
ANI
Published on

राज्यातील भाजपच्या नेतृत्वाखालील ईडी सरकार केवळ हिंदूंच्या हिताचे नाटक करत आहे. खरे तर हे सरकार शेतकरी विरोधी आहे. हिंदूंचे सरकार आले आणि आनंदाने सण साजरे करणाऱ्यांच्या राज्यात हिंदू शेतकरी मदतीपासून वंचित असल्याची टीका काँग्रेसने केली आहे. अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले असताना राज्य सरकारने केवळ मदत जाहीर केली, मात्र अद्यापही शेतकऱ्यांना ही मदत मिळालेली नाही, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले. नाना पटोले म्हणाले की, राज्यातील सध्याचे सरकार केवळ दिखावा आहे या सरकारला शेतकऱ्यांशी काही देणेघेणे नाही. अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना अद्याप मदत मिळालेली नाही. आजही पंचनामा सुरू आहे. अशा कार्यक्रमातून शेतकऱ्यांचे प्रश्न सुटणार नाहीत, असे ते म्हणाले.

कृषीमंत्री हे शेती आणि शेतकऱ्यांचे जाणकार असले पाहिजेत पण सध्याच्या कृषीमंत्र्यांच्या बाबतीत तसे नाही. कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांना शेतकऱ्यांशी काही देणेघेणे नाही, त्यांना शेतकऱ्यांचे दुःख कसे कळणार? असा सवाल पटोले यांनी केला. कार्यक्रम घेऊन शेतकऱ्यांचे प्रश्न सुटतील, असा त्यांचा अंदाज असेल तर तो साफ चुकीचा आहे, असेही ते म्हणाले.

logo
marathi.freepressjournal.in