मविआची वज्रमूठ सभा, पण काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अनुपस्थित; 'हे' कारण आले समोर

छत्रपती संभाजीनगरमध्ये आज वज्रमूठ सभेला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे अनुपस्थित राहिल्याने चर्चांना उधाण आले
मविआची वज्रमूठ सभा, पण काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अनुपस्थित; 'हे' कारण आले समोर

एकीकडे आज महाविकास आघाडीच्या नेत्यांची ‘वज्रमूठ’ सभा होत असताना दुसरीकडे चर्चा झाली ती काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या अनुपस्थितीची. गेल्या काही महिन्यांपासून नाना पटोले हे सातत्याने चर्चेत राहिले आहेत. नाशिक पदवीधर निवडणुकीमध्ये बाळासाहेब थोरातांसोबत झालेल्या मतभेदांपासून नुकतेच वीर सावरकर यांच्या मुद्द्यावरून महाविकास आघाडीत सुरु असलेल्या मतभेदांपर्यंत अनेकदा नाना पटोले यांची भूमिका चर्चेत राहिली. तीनही पक्षांचे मोठे नेते छ. संभाजीनगरच्या सभेसाठी उपस्थित राहिले असताना नाना पटोले मात्र अनुपस्थित होते.

नाना पटोले यांची तब्येत बिघडली असल्याचे कारण देत ते या सभेला अनुपस्थित राहणार असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे आता राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे या सभेला उपस्थित राहिले असून ते काय बोलणार याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष आहे. तसेच, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार आणि जयंत पाटील हे या सभेसाठी हजर आहेत. महाविकास आघाडीची पहिल्यांदाच अशी जाहीर सभा आयोजित करण्यात आल्यामुळे याकडे सगळ्याचे लक्ष लागले आहे.

logo
marathi.freepressjournal.in