स्वातंत्र्यवीर सावरकर वादावरून राहुल गांधी - उद्धव ठाकरेंच्या भेटीची चर्चा; नाना पटोले म्हणाले...

स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावरून काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गटाचे मतभेद सुरु असल्याची चर्चा असताना राहुल गांधी आणि उद्धव ठाकरेंच्या भेटीचीदेखील चर्चा सुरु झाली
स्वातंत्र्यवीर सावरकर वादावरून राहुल गांधी - उद्धव ठाकरेंच्या भेटीची चर्चा; नाना पटोले म्हणाले...
Published on

काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी हे मातोश्रीवर येऊन ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेणार असल्याची चर्चा आहे. गेल्या काही दिवसांमध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर वादावरून काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गटामध्ये मतभेद निर्माण झालेले असताना या भेटीला महत्त्व निर्माण झाले आहे. यावरून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, राहुल गांधींचा तूर्तास असा कोणताही कार्यक्रम नसल्याचे सांगत भेटीची शक्यता तात्पुरती फेटाळून लावली आहे.

स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या मुद्द्यावरून महाविकास आघाडीच्या २ प्रमुख पक्षांमध्ये मतभेद असल्याच्या चारचा गेल्या काही दिवस सुरु होत्या. त्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मध्यस्थी करून हा वाद मिटवण्याचा प्रयत्न केला. असे असताना यावरील चर्चेसाठी राहुल गांधी आणि उद्धव ठाकरेंच्या भेटीच्या चर्चांना उधाण आले आहे. याबद्दल बोलताना नाना पटोले म्हणाले की, "राहुल गांधी आणि उद्धव ठाकरे यांच्या भेटीबद्दल अजून काहीही ठरलेले नाही. काही दिवसांआधी नितीश कुमार, तेजस्वी यादव आणि राहुल गांधींची भेट झाली. तसेच, काल शरद पवारांनी राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खर्गे यांची देखील भेट घेतली. पण राहुल गांधी मुंबईमध्ये येतील असा कोणताही कार्यक्रम सध्या नाही. पण या सर्व भेटी या भाजपविरोधी पक्षांची मोट बांधण्याचे काम सुरु आहे."

logo
marathi.freepressjournal.in