अजित पवार यांनी राज्याच्या विरोधीपक्षनेते पदाचा राजीनामा देवून आपल्या आठ नेत्यांसह मंत्रीपदाची शपथ घेत शिंदे सरकारमद्ये सामील होण्याचा निर्णय घेतला. यानंतर विरोधी पक्षनेते पद रिक्त झालं आहे. राष्ट्रवादीच्या ४० आमदारांचा पाठिंबा अजित पवार यांना असल्याने शरद पवार यांच्या गटाचे संख्याबळ कमी झालं आहे. यामुळे काँग्रेसने राज्याच्या विरोधी पक्षनेते पदावर आपला दावा सांगितला आहे. काँग्रेसच्या चार ते पाच नेत्यांची नावं यासाठी चर्चेत आहेत.
काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आम्ही विरोधी पक्षनेत्याचं नाव फायनल करु त्यानंतरच त्या संदर्भातला प्रस्ताव अध्यक्षांकडे सादर करु असं म्हटलं आहे. यावेळी विरोधी पक्ष म्हणून काँग्रेसच असून आता आमच्यावर मोठी जबाबदारी अल्याचही ते यावेळी म्हणाले. यावेळी त्यांनी राज्यातील शिंदे सरकारवर टीका केली. मराराष्ट्राचं सरकार हे लुटारु असून त्यांनी शेतकऱ्यांसाठी, बेरोजगारांसाठी, महागाई कमी करण्यासाठी ज्या घोषणा केल्या, त्यांच काय झालं असा सवाल केला आहे.
यावेळी मुख्यमंछत्री आमच्याकडे बहूमत असल्याचं म्हणतात. मात्र,. मी त्यांना सांगू इच्छितो की तुमच्याकडे सगळा उधारीचा गोळा केलेला शेंदूर आहे. अशी टीका त्यांनी केली. भाजपचे खायचे दात वेगळे आहेत आणि दाखवायचे वेगळे असंही नाना म्हणाले. काँग्रेसला लोकांच्या प्रश्नांची जाण असून जनतेचे प्रश्न मांडण्यासाठी मांडण्यासाठी काँग्रेसच पुढे येतं असल्याचं ते म्हणाले. यावेळी आम्ही विरोधात बसावं हे महाराष्ट्राच्या जनतेते स्पष्ट केलं असून काँग्रेस आपली भूमिका योग्य पद्धतीने पार पाडेल यात शंका नसल्याचं त्यांनी म्हटलं. विधानसभेच्या पायऱ्यांवर बसून घटनाबाह्यसरहकारचा धिक्कार असो, असं फलक हातात घेऊन विरोधकांनी आंदोलन केलं. यानंतर प्रसारमाध्यामांशी बोलाताना नाना पटोले यांनी ही टीका केली आहे.