Nanded : १२०० रुपयांची लाज महागात; मुख्याध्यापिकेसह दोन शिक्षक ACB च्या जाळ्यात

कंधार तालुक्यातील उस्माननगर येथील जिल्हा परिषद शाळेत आयकर रिटर्न भरण्यासाठी पगाराचे विवरणपत्र मागणाऱ्या शिक्षक दांपत्याला लाच घेताना मुख्याध्यापिका व दोन सहशिक्षक रंगेहाथ अटक झाली आहे. हा प्रकार २९ जानेवारी २०२६ रोजी घडला. या प्रकरणी उस्माननगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्रातिनिधिक छायाचित्र
प्रातिनिधिक छायाचित्र
Published on

नांदेड : कंधार तालुक्यातील उस्माननगर येथील जिल्हा परिषद शाळेत आयकर रिटर्न भरण्यासाठी पगाराचे विवरणपत्र मागणाऱ्या शिक्षक दांपत्याला लाच घेताना मुख्याध्यापिका व दोन सहशिक्षक रंगेहाथ अटक झाली आहे. हा प्रकार २९ जानेवारी २०२६ रोजी घडला. या प्रकरणी उस्माननगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुख्याध्यापिका विद्या बळवंत वांगे (५५), सहशिक्षक रामेश्वर शामराव पांडागळे (५६) आणि गौतम जयवंतराव सोनकांबळे (५६) यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ताब्यात घेतले. हे सर्व उस्माननगर जिल्हा परिषद शाळेत कार्यरत आहेत.

तक्रारदार दांपत्याने सन २०१९ ते सप्टेंबर २०२५ पर्यंत शाळेत शिक्षक व शिक्षिका म्हणून काम केले होते. सप्टेंबर २०२५ मध्ये त्यांची बदली झाली. त्यांना आयकर रिटर्न भरण्यासाठी २०२५ चे पगाराचे विवरणपत्र लागल्याने त्यांनी २६ जानेवारी रोजी मुख्याध्यापिकेकडे स्टेटमेंट देण्याची विनंती केली होती. त्यावेळी प्रत्येकी ६०० रुपये अशी १२०० रुपये लाच मागितली गेली.

पडताळणीत ही मागणी सत्य असल्याचे समोर आले. एसीबीने २९ जानेवारी रोजी सापळा रचला आणि तक्रारदाराने सहशिक्षक पांडागळे याच्याकडे १२०० रुपये दिले. त्यांनी ही रक्कम स्वतःसाठी आणि मुख्याध्यापिका वांगे यांच्यासाठी स्वीकारताना रंगेहाथ पकडली. तसेच सहशिक्षक सोनकांबळे यांनी लाच देण्यास प्रोत्साहन दिले. त्यामुळे तीनही संशयित अटकेत आले आहेत. हा प्रकार जिल्हा परिषद शाळेत लाचलुचपत प्रतिबंधक उपाययोजनांची गरज अधोरेखित करतो.

logo
marathi.freepressjournal.in