
नांदेड : आज महाशिवरात्रीचा उपवास. घराघरात व भंडाऱ्यामध्ये भगरीचा महाप्रसाद केला जातो. मात्र, भगरीमुळे अन्नातून विषबाधा होण्याची शक्यता अधिक असल्याने नागरिकांनी सावध राहावे, भगरीचे सेवन टाळावे, काळजी घ्यावी, असा इशारा नांदेड जिल्हा आरोग्य प्रशासनाने दिला आहे.
गेल्या वर्षी भगर खाल्ल्यामुळे नांदेड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात विषबाधा झाली होती. दोन हजारावर लोकांना भगरीच्या विषबाधेने संकटात आणले होते. त्यामुळे बुधवारी महाशिवरात्रीला भगवान शंकराचे पूजन करताना उपवासासाठी अन्य पदार्थ वापरावे. भगर खाणे उपवासासाठी टाळावे,अशी सूचना नांदेड जिल्हा प्रशासनाने केली आहे.
गेल्यावर्षी लोहा व अर्धापूर तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात विषबाध्येच्या घटना भगरीमुळे झाल्या होत्या.
भगरीमध्ये मोठ्या प्रमाणात अस्परलिस जातीच्या बुरशीचा प्रादुर्भाव होतो. ज्यामुळे फ्युनिगाक्लेविन यासारखी विष द्रव्य (टॉक्सिन) तयार होतात. आद्रता बुरशीच्या वाढीसाठी अनुकूल असते.
विक्रेत्यांनाही कडक सूचना
विक्रेत्यांनी पॅक बंद भगरचीच विक्री करावी भगर करीत खरेदी करताना घाऊक विक्रेत्यांकडून पावती घ्यावी भगरीचे पॅकेट पोत्यावर उत्पादकांचा पत्ता परवाना क्रमांक पॅकिंग दिनांक अंतिम वापर दिनांक असल्याची खात्री करून घ्यावी मुदतबाह्य भगर किंवा भगर पिठाची विक्री करू नये अशा पद्धतीची नियमबाह्य विक्री करणारे आढळल्यास त्यांच्यावर अन्नसुरक्षा का व मानके कायदा 2006 अंतर्गत कारवाई करण्यात येईल असा इशाराही जिल्हा प्रशासनाने दिला आहे.