
महाराष्ट्राच्या नांदेडमध्ये (Nanded) घडलेल्या घटनेने संपूर्ण राज्य हादरले आहे. भावांनी आणि जन्मदात्या पित्यानेच मुलीची हत्या केल्याची घटना समोर आली आहे. हत्या केलेल्या मुलीच्या मैत्रिणीने राज्य महिला आयोगाकडे केलेल्या तक्रारीनंतर हा धक्कादायक प्रकार समोर आला. नांदेडमधील महिपाल पिंपरी येथील ही घटना असून या घटनेचा पोलिसांनी तपास करण्यास सुरुवात केली आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून मुलीचे वडिलांसहित ४ जणांना अटक करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, हत्या केलेल्या मुलीचे नात्यातील मुलाशी प्रेमसंबध असल्याचे तिच्या घरच्यांना कळले होते. यानंतर मुलीला तिच्या वडिलांनी भावासह मारहाण करत तिची हत्या केली. मृत मुलगी ही वैद्यकीय शिक्षण घेत होती. प्रेमसंबंधाची माहिती मिळताच त्यांनी मारहाण केली. यानंतर तिची हत्या करून तिला जाळून तिची राख इतरत्र पसरवली असल्याची माहिती देण्यात आली आहे. ही घटना रविवारी घडली असून गुरुवारी रात्री यासंबंधी ५ जणांवर ३०२ कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेत मुलीचे वडील भाऊ, मामा, दोन चुलतभाऊ अशा ५ आरोपींना अटक करण्यात आली आहे.