Nanded : मुदखेड व मुखेडचा दुष्काळीमध्ये समावेश करा! खा. अशोक चव्हाण यांची मागणी

खरीप हंगामात पावसाने मोठी ओढ दिल्याने राज्य शासनाने २६५ तालुक्यांमध्ये दुष्काळी परिस्थिती जाहीर केली आहे. नांदेड जिल्ह्यातील १६ पैकी १४ तालुक्यांचा या यादीत समावेश करण्यात आला आहे. मात्र, 'ट्रिगर-१' लागू न झाल्याच्या तांत्रिक कारणामुळे मुदखेड आणि मुखेड या दोन तालुक्यांचा समावेश होऊ शकला नाही.
Nanded : मुदखेड व मुखेडचा दुष्काळीमध्ये समावेश करा! खा. अशोक चव्हाण यांची मागणी
Nanded : मुदखेड व मुखेडचा दुष्काळीमध्ये समावेश करा! खा. अशोक चव्हाण यांची मागणी
Published on: 

नांदेड : खरीप हंगामात पावसाने मोठी ओढ दिल्याने राज्य शासनाने २६५ तालुक्यांमध्ये दुष्काळी परिस्थिती जाहीर केली आहे. नांदेड जिल्ह्यातील १६ पैकी १४ तालुक्यांचा या यादीत समावेश करण्यात आला आहे. मात्र, 'ट्रिगर-१' लागू न झाल्याच्या तांत्रिक कारणामुळे मुदखेड आणि मुखेड या दोन तालुक्यांचा समावेश होऊ शकला नाही. प्रत्यक्ष पिकांची स्थिती व शेतकऱ्यांचे झालेले नुकसान लक्षात घेता या दोन्ही तालुक्यांचाही दुष्काळी यादीत समावेश करावा, अशी मागणी माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोक चव्हाण यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.

यासंदर्भात चव्हाण यांनी मुख्यमंत्र्यांना सविस्तर पत्र पाठविले असून, दूरध्वनीवरूनही चर्चा केली आहे. पत्रात त्यांनी मुदखेड तालुक्यात सरासरीच्या ८५ टक्के, तर मुखेड तालुक्यात ८१ टक्के पावसाची नोंद असली, तरी मोठ्या प्रमाणात पाऊस एकाच दिवशी झाल्याने ही आकडेवारी वाढल्याचे नमूद केले आहे. प्रत्यक्षात पावसाचे वितरण असमान राहिले असून, ऑगस्ट महिन्यात पावसाचा मोठा खंड पडल्याने पिकांची वाढ खुंटली आणि शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले.

उपलब्ध माहितीनुसार, मुदखेड तालुक्यातील २१ हजार ६७१ हेक्टर पेरणी क्षेत्रापैकी १३ हजार ८२३ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. मुखेडमध्ये ७५ हजार ८८८ हेक्टरपैकी तब्बल ६१ हजार ६०० हेक्टर क्षेत्राला फटका बसला आहे. यंदा नांदेड जिल्ह्याच्या उत्पादनात ७०.६९ टक्के संभाव्य घट अपेक्षित असून, मुदखेड व मुखेडमध्येही उत्पादनातील संभाव्य घट ६० ते ७० टक्क्यांच्या आसपास असल्याचे चव्हाण यांनी म्हटले आहे.

दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर वैरण व्यवस्थापनावर भर

दुष्काळी परिस्थितीत पशुधनासाठी वैरणीची उपलब्धता कायम ठेवण्यासाठी प्रभावी नियोजन करावे. उपलब्ध हिरवा व वाळलेला चारा काटकसरीने व शास्त्रीय तसेच कृषी अवशेषांचा पद्धतीने वापर करावा, असे निर्देश जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी महेश पाटील यांनी दिले. लोहा तालुक्यातील सायाळ येथे वैरण विकास योजनेची त्यांनी पाहणी केली. प्रगतिशील शेतकरी रत्नाकर ढगे यांच्या शेतातील चारा लागवड व गोठ्याचीही त्यांनी पाहणी केली. हिरव्या चाऱ्याचे संवर्धन करण्यासाठी मुरघास निर्मितीला प्रोत्साहन देण्याचे आवाहन करण्यात आले. कडबाकुट्टी यंत्राचा वापर, निकृष्ट चाऱ्यावर प्रक्रिया आणि बांधावर नेपियर गवताची लागवड करण्याबाबतही जनजागृती करण्याच्या सूचना देण्यात आल्या.

नांदेड जिल्ह्यातील १४ तालुक्यांचा दुष्काळग्रस्त यादीत समावेश

नांदेड : राज्यातील २६५ तालुक्यांमध्ये दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली असून, नांदेड जिल्ह्यातील १४ तालुक्यांचा दुष्काळग्रस्त यादीत समावेश करण्यात आला आहे. या तालुक्यांमध्ये शेतकरी, विद्यार्थी, शेतमजूर, नागरिक तसेच पशुधनाला दिलासा देण्यासाठी १२ उपाययोजना व सवलती लागू करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. नांदेड, बिलोली, कंधार, लोहा, हदगाव, भोकर, देगलूर, किनवट, हिमायतनगर, माहूर, धर्माबाद, उमरी, अर्धापूर आणि

नायगाव या तालुक्यांमध्ये 'ट्रिगर-१ 'नुसार पंचनामे करण्यात येणार आहेत. जूनपासून आतापर्यंतच्या पर्जन्य-मानातील तूट आणि अन्य घटकांचा विचार करून ही प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. सर्वेक्ष-णादरम्यान पिकांची सद्य:स्थिती दर्शविणारी छायाचित्रे तसेच जीपीएस निर्देशांक संकलित केले जातील. उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, कृषिमंत्री दत्तात्रय भरणे आणि पालकमंत्री अतुल सावे यांनी जिल्ह्यातील परिस्थितीचा आढावा घेतला होता.

(संबंधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in