नांदेड लोकसभा पोटनिवडणूक: रवींद्र चव्हाण काँग्रेसचे उमेदवार; 'एमआयएम'मुळे रंगत वाढणार!

नांदेड लोकसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसने दिवंगत खासदार वसंतराव चव्हाण यांचे पुत्र रवींद्र चव्हाण यांना उमेदवारी जाहीर केली आहे, त्यापाठोपाठ 'एमआयएम' कडून इम्तियाज जलील हे मैदानात उतरणार असल्याचे जाहीर करण्यात आले. जलील यांच्या उमेदवारीमुळे भाजप उमेदवाराला...
रवींद्र चव्हाण, संग्रहित छायाचित्र
रवींद्र चव्हाण, संग्रहित छायाचित्र
Published on

मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीबरोबर नांदेडमध्ये लोकसभा पोटनिवडणूक जाहीर करण्यात आली आहे. नांदेडमध्ये काँग्रेस पक्षाने स्व. खासदार वसंतराव चव्हाण यांचे पुत्र रवींद्र चव्हाण यांना उमेदवारी जाहीर केली आहे, तर 'एमआयएम'चे नेते आणि माजी खासदार इम्तियाज जलील यांनीही नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी दंड थोपटले आहेत. भाजपने अद्याप येथे आपला उमेदवार जाहीर केलेला नाही. मात्र, जलील यांच्या उमेदवारीमुळे भाजप उमेदवाराला येथे फायदा होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

खासदार वसंतराव चव्हाण यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या नांदेड लोकसभा मतदारसंघातील जागेसाठी केंद्रीय निवडणूक आयोगाकडून पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीसोबतच २० नोव्हेंबर रोजी नांदेड लोकसभेच्या जागेसाठी मतदान होणार आहे. नांदेड लोकसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसने दिवंगत खासदार वसंतराव चव्हाण यांचे पुत्र रवींद्र चव्हाण यांना उमेदवारी जाहीर केली आहे, त्यापाठोपाठ 'एमआयएम' कडून इम्तियाज जलील हे मैदानात उतरणार असल्याचे जाहीर करण्यात आले. भाजपने आपला उमेदवार अद्याप निश्चित केलेला नाही. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे दिवंगत नेते वसंतराव चव्हाण यांनी भाजपचे उमेदवार प्रतापराव चिखलीकर यांचा पराभव केला होता. मात्र, खासदार वसंतराव चव्हाण यांचे अवघ्या तीन महिन्यांतच निधन झाले. त्यामुळे नांदेडमध्ये पोटनिवडणूक होणार आहे.

logo
marathi.freepressjournal.in