शिंदे सेनेने उबाठाशी हातमिळवणी केल्यास संबंध तोडू; खासदार नारायण राणे यांचा इशारा

कणकवली नगरपंचायत निवडणुकीत एकनाथ शिंदे गटाची शिवसेना (बाळासाहेबांची शिवसेना) आणि उद्धव ठाकरे गट एकत्र येऊन निवडणूक लढवणार असल्याच्या चर्चेला उधाण आले असताना, भाजपचे खासदार नारायण राणे यांनी कठोर भूमिका जाहीर केली आहे.
शिंदे सेनेने उबाठाशी हातमिळवणी केल्यास संबंध तोडू; खासदार नारायण राणे यांचा इशारा
शिंदे सेनेने उबाठाशी हातमिळवणी केल्यास संबंध तोडू; खासदार नारायण राणे यांचा इशारासंग्रहित छायाचित्र
Published on

कणकवली : कणकवली नगरपंचायत निवडणुकीत एकनाथ शिंदे गटाची शिवसेना (बाळासाहेबांची शिवसेना) आणि उद्धव ठाकरे गट एकत्र येऊन निवडणूक लढवणार असल्याच्या चर्चेला उधाण आले असताना, भाजपचे खासदार नारायण राणे यांनी कठोर भूमिका जाहीर केली आहे.

दोन्ही शिवसेना गटांनी कणकवलीत युती केल्यास, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात आम्ही शिंदे सेनेशी सर्व संबंध तोडून टाकू, असा इशारा त्यांनी पत्रकार परिषदेत दिला. शहर विकास आघाडीच्या चर्चेवर राणे संतापले. कणकवलीत 'शहर विकास आघाडी'च्या नावाखाली दोन्ही शिवसेना गट एकत्र येणार असल्याची चर्चा गेल्या दोन दिवसांपासून होती. शिवाय, शिंदे सेनेत दाखल झालेले माजी आमदार राजन तेली यांनीही युतीच्या चर्चेला दुजोरा दिला होता. पत्रकारांनी याबाबत प्रश्न विचारताच राणे यांनी थेट नाराजी व्यक्त केली.

खुमखुमी म्हणाले, आता स्वतंत्र लढायची कशासाठी? राणे लोकसभा आणि विधानसभा निवडणुका आम्ही एकत्र लढलो. मग स्थानिक संस्थांच्या निवडणुकांमध्येच स्वतंत्र लढायचे का? रत्नागिरी-सिंधुदुर्गमध्ये युती व्हावी अशी सर्वांची इच्छा आहे. भाजप व शिवसेना पदाधिकाऱ्यांशी आज चर्चा केली असून युती हवी, असे सर्वच म्हणत आहेत. मग अचानक वेगळे लढण्याची उतावळेपणा का?" मी यांना नेता मानत नाही. राजन तेली कोण? तो स्वतः 'प्रतिष्ठित नागरिक' आहे का ते आधी पाहावे. विशाल परबने भाजपवर जेवढी टीका केली, त्याचा हिशोब त्यालाच देऊ. तो कुठेही भेटू दे, त्याला मी काय ते सांगेन, आणि तेव्हा तुम्हाला खरी ब्रेकिंग न्यूज मिळेल असे राणेंनी स्पष्ट केले.

दोन दिवसांत निर्णय अपेक्षित

सिंधुदुर्गातील सर्व स्थानिक स्वराज्य निवडणुका महायुतीनेच लढवायच्या आहेत. भाजप-शिंदे सेना युतीचा औपचारिक निर्णय दोन दिवसांत होईल. जागावाटपावरही फॉर्म्युला ठरेल, असे राणे यांनी स्पष्ट केले.

राणे कुटुंबात वाद नाही; होऊ देणारही नाही

सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे खासदार नारायण राणे यांनी कुटुंबीयांमधील राजकीय मतभेदांच्या चर्चाना स्पष्ट शब्दांत फाटा देत सांगितले की, 'शाहनिशा केल्याशिवाय कोणतीही बातमी देऊ नका. मी जोपर्यंत आहे, तोपर्यंत राणे कुटुंबांतर्गत कोणताही वाद होणार नाही. वाद होऊ देणार नाही. राणे पुढे म्हणाले, 'आमच्यात अराजकीय स्वार्थासाठी कोणताही वाद नाही. मी कोकणात ३५ वर्षे राजकारणात आहे. कुटुंबात एकी आहे आणि पुढेही राहील.' अलीकडेच राणे कुटुंबातील काही घडामोडींना राजकीय रंग देण्याचा प्रयत्न होत असल्याच्या पार्श्वभूमीवर राणे यांनी ही भूमिका स्पष्ट केली.

logo
marathi.freepressjournal.in