वाढत्या वयामुळे नारायण राणे निवडणूक लढवणार नाहीत - निलेश राणे

एकूण मतांचा विचार करता रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघावर भाजपचाच दावा आहे.
वाढत्या वयामुळे नारायण राणे निवडणूक लढवणार नाहीत - निलेश राणे

रत्नागिरी : केंद्र शासनाच्या मायक्रो स्मॉल अँड मीडियम विभागामार्फत (एमएसएमई) फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात रत्नागिरीत ३ दिवसीय प्रदर्शन आयोजित केले जाणार आहे. त्यासाठी केंद्रातील ८० अधिकारी रत्नागिरीत माहिती देण्यासाठी येतील. यातून उद्योग व्यवसायाला मोठी चालना मिळणार आहे, अशी माहिती माजी खासदार नीलेश राणे दिली.

एकूण मतांचा विचार करता रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघावर भाजपचाच दावा आहे. मी या निवडणुकीसाठी इच्छुक नाही आणि केंद्रीय मंत्री नारायण राणेदेखील वयोमानानुसार निवडणूक लढवणार नसल्याचा खुलासा राणे यांनी केला. शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ते म्हणाले, ‘केंद्र शासनाच्या मध्यम, लघु, सूक्ष्म उद्योग विभागामार्फत सिंधुदुर्ग जिल्ह्यात तीन दिवसीय प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांनी प्रदर्शनाचे उत्तम नियोजन केल्याने ते गावागावांत पोहोचले. विश्वासार्ह योजना म्हणून प्रदर्शनाचे चित्र सिंधुदुर्ग जिल्ह्यात उभे राहिले. अशाच प्रकारचे प्रदर्शन रत्नागिरी जिल्ह्यातही भरवावे, अशी मागणी भाजप जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांनी केली होती. त्यांच्या मागणीनुसार १ ते १० फेब्रुवारीदरम्यान रत्नागिरीत प्रदर्शन भरवले जाणार आहे. प्रदर्शनात विविध प्रकारचे स्टॉल उभारले जाणार आहेत. एमएसएमईमार्फत सादरीकरण केले जाणार आहे. कर्जाऐवजी सुविधा देणे हाच प्रदर्शनाचा मुख्य हेतू आहे.’

logo
marathi.freepressjournal.in