नारायण राणेंची उद्धव ठाकरेंवर बोचरी टीका

शिवसेनेचे ४० हून अधिक आमदार सामील झाले, अजून काही जण शिंदे यांच्याकडे जाण्याच्या तयारीत असल्याचेही राणे म्हणाले
File Photo
File PhotoANI

दसरा मेळाव्याबद्दल उद्धव ठाकरेंकडे बोलायला काय उरले आहे, असा सवाल केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केला. राणे यांनी ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना संपली असून खरी एकनाथ शिंदे यांची शिवसेना असल्याचे वक्तव्य केले. भाजप नेते निलेश राणे यांच्या वतीने कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी खास 'मोदी एक्स्प्रेस' सोडण्यात आली. यावेळी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यासह निलेश राणेही उपस्थित होते. पत्रकारांशी संवाद साधताना नारायण राणे यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली. आवाज कोणाचा याचे उत्तर मिळाले असून आता त्यांचा आवाज बंद झाल्याचे राणे म्हणाले. शिवसेनेकडे एकही आमदार नाही. एकनाथ शिंदे यांच्या गोटात शिवसेनेचे ४० हून अधिक आमदार सामील झाले, अजून काही जण शिंदे यांच्याकडे जाण्याच्या तयारीत असल्याचेही राणे म्हणाले.

उद्धव ठाकरे आणि त्यांची शिवसेना आता उरली नाही. शिवाजी पार्कवर बोलण्यासारखं काही उरलं नाही, असा चिथावणीखोर प्रश्न त्यांनी विचारला. नारायण राणे म्हणाले की, शिवसेनेचा खरा विश्वासघात उद्धव ठाकरेंनी केला आहे. उद्धव ठाकरेंनी गद्दारी करून मुख्यमंत्रीपद मिळवले, असा हल्लाबोल राणेंनी केला. राणे म्हणाले की, भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्याशी गद्दारी करून उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रीपद मिळवले.

नारायण राणे म्हणाले की, मुख्यमंत्रीपद घरी बसून सांभाळता येत नाही. अडीच वर्षांत राज्य सरकार 10 वर्षे मागे गेले. राणे म्हणाले की, गणरायाच्या कृपेने पूर्वीचे सरकार गेले आणि नवे सरकार आले. महाराष्ट्रात केंद्रात आणि राज्यात भाजपची सत्ता आहे. त्यामुळे आता राज्याचा सर्वांगीण विकास होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in