Video : बिनशर्त पाठिंब्यानंतर नरेंद्र मोदी अन् राज ठाकरे पहिल्यांदाच एका व्यासपीठावर, समोर आला पहिला टिझर

लोकसभा निवडणुकीत महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे १७ मे रोजी मुंबईतील छत्रपती शिवाजी पार्क येथे जाहीर सभा घेणार आहेत.
नरेंद्र मोदी-राज ठाकरे
नरेंद्र मोदी-राज ठाकरेप्रातिनिधिक फोटो
Published on

मुंबई: लोकसभा निवडणुकीत महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे १७ मे रोजी मुंबईतील छत्रपती शिवाजी पार्क येथे जाहीर सभा घेणार आहेत. या सभेच्या निमित्तानं मोदी आणि राज ठाकरे पहिल्यांदाच एकाच व्यासपीठावर येणार आहेत. या सभेचा टीझर मनसेकडून लॉन्च करण्यात आला आहे.

सध्या देशभरात लोकसभा निवडणूका सुरु आहेत. एकूण सात टप्प्यांमध्ये होणाऱ्या या निवडणूकांतील पहिल्या तीन टप्प्यांतील मतदान पार पडलं आहे. आता उरलेल्या चार टप्प्यांमध्ये जास्तीत जास्त जिंकण्यासाठी सर्वच पक्षांनी कंबर कसली आहे. या निवडणूकीत राज ठाकरे नेमकी काय भूमिका घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं होतं. त्यानंतर राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी महायुतीला बिनशर्त पाठिंबा जाहीर केला. काहीच दिवसांपूर्वी नारायण राणे यांच्या प्रचारसाठी राज ठाकरेंनी रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघात जाहीर सभा घेतली होती.

बिनशर्त पाठिंब्यानंतर राज-मोदी पहिल्यांदाच एका व्यासपीठावर-

महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिल्यानंतर आता पहिल्यांदाच मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी एकाच व्यासपीठावर उपस्थित राहणार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह सर्व प्रमुख नेते या सभेला उपस्थित राहणार आहेत. दरम्यान या सभेचा टीझर समोर आला आहेत.

टीझरमध्ये नेमकं काय?

मनसे नेते संदीप देशपांडे यांनी हा टिझर सोशल मीडियावर शेअर केला आहे. ‘17 मे 2024, औरंग्याच्या औलादींना गाडायला मुंबईत एकत्र येणार, दोन कट्टर हिंदुत्ववादी... ऐतिहासिक मोदी-राज भेटीचे साक्षीदार व्हायला चला शिवतिर्थावर’, असं म्हणत हा टिझर शेअर करण्यात आला आहे.

logo
marathi.freepressjournal.in