Nashik : लाचप्रकरणी महिला मंडळ अधिकारी जेरबंद; ACB ने ५० हजाराची लाच घेताना रंगेहाथ पकडले

चांदवड तालुक्यात महिला मंडळ अधिकाऱ्याला ५० हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आल्याने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. योगिता आनंद भोये असे अटक करण्यात आलेल्या अधिकाऱ्याचे नाव असून, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (ACB) कारवाईमुळे महसूल विभागात खळबळ माजली आहे.
लाचप्रकरणी महिला मंडळ अधिकारी जेरबंद; ACB ने ५० हजाराची लाच घेताना  रंगेहाथ पकडले
लाचप्रकरणी महिला मंडळ अधिकारी जेरबंद; ACB ने ५० हजाराची लाच घेताना रंगेहाथ पकडलेप्रातिनिधिक छायाचित्र
Published on

नाशिक : चांदवड तालुक्यात महिला मंडळ अधिकाऱ्याला ५० हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आल्याने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. योगिता आनंद भोये असे अटक करण्यात आलेल्या अधिकाऱ्याचे नाव असून, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (ACB) कारवाईमुळे महसूल विभागात खळबळ माजली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदाराची वडिलोपार्जित शेतीजमीन वादात अडकली होती. या प्रकरणी न्यायालयाने तक्रारदाराच्या बाजूने निकाल देत संबंधित जमिनीचा ताबा देण्याचे आदेश महसूल विभागाला दिले होते. त्यानुसार चांदवड तहसील कार्यालयाने जमिनीचा ताबा देण्याची प्रक्रिया पूर्ण करण्याची जबाबदारी मंडळ अधिकारी म्हणून योगिता भोये यांच्याकडे सोपवली होती. तथापि, ही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी भोये यांनी सुरुवातीला ६० हजार रुपयांची लाच मागितल्याचा आरोप तक्रारदाराने केला आहे. चर्चेनंतर ही रक्कम ५० हजार रुपयांवर निश्चित करण्यात आली. यानंतर तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली.

तक्रारीची पडताळणी केल्यानंतर एसीबी पथकाने सापळा रचून योगिता भोये यांना ५० हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले. या कारवाईमुळे महसूल विभागातील भ्रष्टाचाराचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.

logo
marathi.freepressjournal.in