नाशिकमध्ये भाजप निष्ठावंतांनी गिरीश महाजनांना घेरले

राज्यात मनपा निवडणुकीला सुरुवात झाली असून सत्ताधारी भाजपात विविध पक्षातून अनेक राजकीय नेत्यांचे ‘इनकमिंग’ सुरू झाले आहे. याचे पडसाद आता भाजपच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांमध्ये उमटू लागले आहेत.
नाशिकमध्ये भाजप निष्ठावंतांनी गिरीश महाजनांना घेरले
नाशिकमध्ये भाजप निष्ठावंतांनी गिरीश महाजनांना घेरलेPhoto- X(@girishdmahajan)
Published on

नाशिक : राज्यात मनपा निवडणुकीला सुरुवात झाली असून सत्ताधारी भाजपात विविध पक्षातून अनेक राजकीय नेत्यांचे ‘इनकमिंग’ सुरू झाले आहे. याचे पडसाद आता भाजपच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांमध्ये उमटू लागले आहेत. नाशिकमध्ये पक्ष प्रवेशासाठी आलेले भाजपचे नेते व राज्याचे मंत्री गिरीश महाजन यांना कार्यकर्त्यांनी घेरून जाब विचारला.

नाशिकमध्ये भाजपमध्ये गुरुवारी माजी आमदार, माजी महापौरासह ५ मोठ्या नेत्यांचे प्रवेश झाला. यावर नाशिकमधील भाजपचे स्थानिक नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते नाराज झाले.

भाजप आमदार देवयानी फरांदे यांनी या पक्ष प्रवेशाला अनुपस्थित राहत विरोध केला होता. मात्र, तरीही मंत्री गिरीश महाजन यांच्या प्रमुख उपस्थितीत हे प्रवेश झाले. यावेळी, मंत्री गिरीश महाजन पक्षप्रवेशााठी भाजप कार्यालयात येत असताना, भाजपच्या निष्ठावंतांनी त्यांना कार्यालयाबाहेरच घेराव घातला होता.

नाशिकमधील पक्षप्रवेशावेळी भाजप कार्यालयाबाहेर काही वेळ गोंधळाची परस्थिती निर्माण झाली होती. भाजप सर्वात मोठा पक्ष आहे, सर्वाधिक आमदार खासदार भाजपचे आहेत. आज दिनकर पाटील यांनी प्रवेश केला आहे, दिनकर पाटील यांनी आता कुठे जाऊ नये, असे या पक्षप्रवेशानंतर गिरीश महाजन यांनी म्हटले. मनसे, काँग्रेस, उबाठाचे सर्व पदाधिकाऱ्यांनी इथे प्रवेश केला आहे, मी सर्वांचे स्वागत करतो. प्रमुख पदाधिकाऱ्यांसह सर्व आले आहेत, बाहेर आता कोणीही राहिले नाही. १०० च्या वर आमचे नगरसेवक निवडून येतील, आता चार वाढल्याने १०४ होतील, असेही महाजन यांनी म्हटले.

logo
marathi.freepressjournal.in