Nashik : नाशिकमध्ये चालत्या बसला आग; चालकाच्या प्रसंगावधानाने वाचला ३५ प्रवाशांचा जीव

मालेगाववरून नाशिककडे (Nashik) निघालेल्या चालत्या बसला अचानक आग लागली आणि चांगलाच गोंधळ उडाला.
Nashik : नाशिकमध्ये चालत्या बसला आग; चालकाच्या प्रसंगावधानाने वाचला ३५ प्रवाशांचा जीव

गेले काही दिवस राज्यामध्ये अनेक ठिकाणी अग्नितांडव पाहायला मिळाले. अशीच एक घटना नाशिकमधून (Nashik) समोर आली आहे. चांदवड घाटामध्ये एका चालत्या बसला अचानक आग लागल्याची घटना समोर आली. या आगीमध्ये बस पूर्णपणे खाक झाली असून यामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही. विशेष म्हणजे चालकाने दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे या बसमधून प्रवास करत असलेल्या ३५ प्रवाशांचे प्राण वाचले.

मिळालेल्या माहितीनुसार, मालेगाववरुन नाशिककडे जाणारी बस चांदवड घाटामध्ये आली. यावेळी बसने अचानक पेट घेतला. ही बाब चालक आणि कंडक्टरच्या लक्षात येताच त्यांनी कोणताही वेळ न दवडता प्रवाशांना खाली उतरवले. त्यांनी दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे मोठी दुर्घटना टळली. मात्र,या आगीमध्ये बसचे नुकसान झाले असून ती पूर्णपणे जाळून खाक झाली. यावेळी मंगरूळ टोल नाक्याजवळ असलेली अग्निशमन दलाची गाडी त्वरित घटनास्थळी दाखल झाली.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in