Nashik : ढोबळी मिरची खातेय भाव! प्रति क्विंटलला पाच हजारांचा दर

राज्यावर दुष्काळाचे संकट घोंघावले असतानाच, आता भाजीपाल्याची आवक कमी होऊ लागली आहे. त्यामुळेच भाजीपाल्यांचे दर गगनाला भिडण्यास सुरुवात झाली आहे.
Nashik : ढोबळी मिरची खातेय भाव! प्रति क्विंटलला पाच हजारांचा दर
Nashik : ढोबळी मिरची खातेय भाव! प्रति क्विंटलला पाच हजारांचा दर'एआय'ने बनविलेली प्रातिनिधिक प्रतिमा
Published on: 

हारून शेख

लासलगाव : राज्यावर दुष्काळाचे संकट घोंघावले असतानाच, आता भाजीपाल्याची आवक कमी होऊ लागली आहे. त्यामुळेच भाजीपाल्यांचे दर गगनाला भिडण्यास सुरुवात झाली आहे. नाशिक जिल्ह्यात भाजीपाला बाजारात सध्या विविध भाज्यांच्या दरांमध्ये चढउतार पाहायला मिळत असून शिमला मिरचीने सध्या भाव खाल्ला आहे. हायब्रिड ढोवळी मिरचीला प्रतिक्विंटल मागे ३ हजार ७५० ते ५ हजार रुपये आणि सरासरी ४ हजार ३७५ दर मिळत आहे.

कोथिंबिर सध्या महागली असून ७०० ते ४ हजार ४५० प्रति क्विंटल दर मिळत आहे. मेथीला १५२५ ते २ हजार ९२५ तर सरासरी २१५० दर मिळत आहे. घोसाळी १२५० ते २ हजार ८५, कांदा पात १५० ते १८५०, मुळा ११०० ते १७५० दरम्यान आहे. काकडीला ७५० ते १,७५०, कारल्याला ८३५ ते १५००, तर कोबीला ४१५ ते ७५० दर मिळत आहेत.

राज्यातील दुष्काळसदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर शेती उत्पादनावर परिणाम होण्याची चिंता व्यक्त होत असतानाच दुष्काळी परिस्थितीत भाजीपाला पिकांना नियमित पाणी देणे शेतकऱ्यांसाठी मोठे आव्हान ठरत आहे. त्यामुळे आगामी काळात आवक घटल्यास भाजीपाल्यांच्या दरात वाढ होण्याची शक्यता आहे. सध्या बाजारभावावर आवक आणि मागणीचा मोठा प्रभाव जाणवत आहे.

दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर पाणीटंचाई आणि उत्पादन खर्चात होणारी वाढ लक्षात घेता, भाजीपाला उत्पादकांचे लक्ष बाजारपेठेकडे लागले आहे. आगामी काळात आवक घटल्यास भाजीपाल्यांच्या दरात वाढ होण्याची शक्यता निर्माण होऊ शकते त्याचा फटका मुंबई उपनगरात आणि राज्यातील अनेक ठिकाणी बसू लागला आहे.

पितृपंधरवड्याचाही परिणाम

१२ दिवसांच्या गणपतीचे विसर्जन झाल्यानंतर पितृपंधरवडा सुरू होताच भाजीपाल्याची मागणीही वाढली आहे. नवी मुंबईतील एपीएमसी बाजारात भाजीपाल्याची आवक वाढली असली तरी ग्राहकांनीही भाजीपाल्याकडे मोर्चा वळवला आहे. भेंडी, फरसबी, फ्लॉवर, गवार, घेवडा, तोंडली, हिरवा वाटाणा यांचे दर वाढले आहेत. शेवग्याच्या शेंगांचे दरही दुप्पट झाले आहेत.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in