नाशिक टीसीएस प्रकरण : निदा खानच्या जामिनावर दोन मे रोजी सुनावणी

लैंगिक शोषण आणि कथित धर्मांतर यामुळे राज्यभर गाजत असलेल्या टीसीएस प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी निदा खान हिच्या अटकपूर्व जमीन अर्जावरील निकाल नाशिक रोड न्यायालयाने राखून ठेवला आहे.
नाशिक टीसीएस प्रकरण : निदा खानच्या जामिनावर दोन मे रोजी सुनावणी
नाशिक टीसीएस प्रकरण : निदा खानच्या जामिनावर दोन मे रोजी सुनावणी
Published on

नाशिक : लैंगिक शोषण आणि कथित धर्मांतर यामुळे राज्यभर गाजत असलेल्या टीसीएस प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी निदा खान हिच्या अटकपूर्व जमीन अर्जावरील निकाल नाशिक रोड न्यायालयाने राखून ठेवला आहे. त्यासंदर्भातील सुनावणी आता येत्या शनिवारी म्हणजे २ मे रोजी होणार आहे. नाशिक रोड अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश केदार जोशी यांच्यासमोर सुनावणी पार पडली. निदा खान हिच्यावातीने विधिज्ञ राहुल कासलीवाल यांनी युक्तिवाद केला, सरकारी वकील अजय मिसर यांनी पोलिसांची बाजू मांडली. मिसर यांनी जामिनाला सक्त विरोध केला. एसआयटी प्रमुख संदीप मिटके हेदेखील उपस्थित होते.

नाशिक टीसीएस प्रकरण : निदा खानच्या जामिनावर दोन मे रोजी सुनावणी
नाशिक टीसीएस प्रकरण: निदा खानच मुख्य सूत्रधार; २० दिवसांपासून फरार, सात जणांना अटक, तपासात धक्कादायक माहिती

या संदर्भात देवळाली पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यात पोलिसांनी यापूर्वीच दोन संशयित दानिश शेख आणि तौसीफ अत्तार यांना अटक केली आहे. तथापि, या प्रकरणात आरोपींना चिथावणी देणारी निदा खान अद्यापही पोलिसांना गुंगारा देत आहे. सदर गुन्ह्यात अॅट्रोसिटीचे अतिरिक्त कलम लावण्यात आल्याने प्रकरणाचे गांभीर्य वाढले आहे. निदा खान हिला जामीन मिळणार की तिला तुरुंगाची हवा खावी लागणार याचा फैसला येत्या २ मे रोजी होणार आहे.

logo
marathi.freepressjournal.in