नाशिकमधील डॉ. कैलास राठी यांच्यावर हल्ला; महिला कर्मचाऱ्याच्या पतीला हल्ल्यासंबंधात अटक

या हल्ल्यानंतर डॉ. राठी यांच्या पत्नीने केलेल्या तक्रारीनंतर माजी महिला कर्मचारी आणि तिच्या पतीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला
नाशिकमधील डॉ. कैलास राठी यांच्यावर हल्ला;
महिला कर्मचाऱ्याच्या पतीला हल्ल्यासंबंधात अटक
Published on

नाशिक : पंचवटी भागातील वैद्यकीय व्यावसायिक असणारे डॉ. कैलास राठी (४८) यांच्यावर आर्थिक देवाणघेवाणीतून झालेल्या वादात शुक्रवारी रात्री विळ्याने जीवघेणा हल्ला करण्यात आला. त्यांची प्रकृती गंभीर असून त्यांच्यावर स्थानिक रुग्णालयात उपचार चालू आहेत. या प्रकरणी एका इसमास अटक करण्यात आली आहे.

पोलीस अधिकाऱ्याने रविवारी या संबंधात माहिती देताना सांगितले की, राठी यांच्याकडील एका महिला कर्मचाऱ्याच्या पतीने हा हल्ला केला असून त्याला अटक करण्यात आली आहे. या हल्ल्याच्या निषेधार्थ इंडियन मेडिकल असोसिएशनने शनिवारी आपला निषेध मोर्चा आयोजिला होता. मात्र या प्रकरणी त्या इसमाला अटक करण्यात आल्यानंतर तो रद्द केला, असे कार्यकर्त्यांनी सांगितले.

डॉ. राठी यांच्या रुग्णालयात काम करताना संबंधित महिला कर्मचाऱ्यावर ६ लाख रुपयांचा गैरवापर केल्याचा आरोप आहे. तिला काही वर्षांनंतर काढून टाकण्यात आले आणि पुन्हा कामावर घेण्यात आले. तिने पुन्हा त्यांच्याकडून १२ लाख रुपये घेतले. पण ते परत देण्यास नकार दिला. या हल्ल्यानंतर डॉ. राठी यांच्या पत्नीने केलेल्या तक्रारीनंतर माजी महिला कर्मचारी आणि तिच्या पतीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

logo
marathi.freepressjournal.in