Nashik : नाशिकात सावकारी जाचाला कंटाळून ३ जणांची आत्महत्या; २१ सावकारांवर गुन्हा दाखल

नाशिकमध्ये (Nashik) शिराेडे कुटुंबातील तिघांनी सावकाराच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केल्यानंतर राज्यात खळबळ उडाली होती
Nashik : नाशिकात सावकारी जाचाला कंटाळून ३ जणांची आत्महत्या; २१ सावकारांवर गुन्हा दाखल

नाशिकमधील सातपूरच्या राधाकृष्णनगरमध्ये राहणाऱ्या शिराेडे कुटुंबातील तिघांनी आत्महत्या केली. सावकाराच्या जाचाला कंटाळून ही आत्महत्या झाल्याची माहिती समोर आली आहे. पित्यासह २ मुलांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. समोर आलेल्या माहितीनुसार, ७० लाख रुपयांच्या कर्जामध्ये ३१ लाखांचे कर्ज हे सावकारांकडून घेतले होते. ते वसूल करण्यासाठी अनेक सावकारांचे त्यांना सतत फोन जात होते. आत्महत्या करण्यापूर्वी त्यांनी एका नोटमध्ये सावकाराच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केल्याचे समोर आले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ५५ वर्षीय दीपक शिरोडे, २५ वर्षीय मुलगा प्रसाद शिरोडे आणि २३ वर्षीय राकेश शिरोडे अशी आत्महत्या केलेल्या तिघांची नावे आहेत. एकाच घरातील तीन वेगवेगळ्या खोल्यांमध्ये पंख्याला गळफास घेत आत्महत्या केली. मूळचे देवळा तालुक्यातील उमराणे येथून असणाऱ्या शिरोडे कुटुंबीय गेली १० वर्षे व्यवसायानिमित्त नाशिकमध्ये राहत होते. त्यांनी व्यवसायासाठी वाढीव व्याजासह काही पैसे सावकारांकडून घेतले होते. तुम्ही पैसे दिले नाहीत तर त्याचे परिणाम वाईट होतील, अशा धमक्यादेखील त्यांनी दिल्या. दरम्यान, पोलिसांनी २१ सावकारांवर गुन्हा दाखल करण्यात आले आहे. तर, १० आरोपींना अटक केली असून अद्याप ११ सावकारांचा शोध पोलिसांकडून सुरु आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in