Shubhangi Patil : गायब शुभांगी पाटील आल्या समोर, म्हणाल्या 'मी माझ्या उमेदवारीवर ठाम'

नाशिक पदवीधर मतदारसंघात ठाकरे गटाने पाठिंबा दर्शविलेल्या शुभांगी पाटील (Shubhangi Patil) गायब झाल्याने मोठा गोंधळ निर्माण झाला होता
Shubhangi Patil : गायब शुभांगी पाटील आल्या समोर, म्हणाल्या 'मी माझ्या उमेदवारीवर ठाम'

नाशिक पदवीधर मतदारसंघात अनेक घडामोडी घडत आहेत. एकीकडे सत्यजित तांबे यांनी अपक्ष म्हणून फॉर्म भरला होता. तर, दुसरीकडे आज उमेदवारी मागे घेण्याचा शेवटचा दिवस असताना सकाळपासून ठाकरे गटाने पाठिंबा दर्शविलेल्या शुभांगी पाटील (Shubhangi Patil) मात्र गायब होत्या. अखेर उमेदवारी मागे घेण्याची मुदत संपल्यानंतर त्या सर्वांसमोर आल्या. त्या म्हणाल्या की, "मला ठाकरे गटाने पाठिंबा दिला आहे. मी माझ्या उमेदवारीवर ठाम आहे," असे त्यांनी स्पष्ट केले आहे.

साकळपासून नॉट रिचेबल असणाऱ्या शुभांगी पाटील या विभागीय आयुक्त कार्यालयात आल्यानंतर माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्या म्हणाल्या की, "मी माझ्या उमेदवारी ठाम आहे. मी गायब झाले नव्हते. मला ठाकरे गटाचा पाठिंबा असून अनेक शिक्षक संघटनांशी चर्चा केली आहे. ते मला पाठिंबा देण्यासाठी तयार आहेत. पेन्शन योजना असो किंवा विद्यार्थ्यांचे प्रश्न असो, यासाठी मी निवडणुकीला उभी राहिली आहे. सर्व संघटना मला पाठिंबा देतील, असा मला ठाम विश्वास आहे," असा दावा त्यांनी केला आहे. पुढे त्या म्हणाल्या की, "सत्यजीत तांबेंबद्दल मला काही बोलता येणार नाही. कारण, काँग्रेसचा काय निर्णय होईल? हे सांगता येणार नाही. असे असले तरीही, मला महाविकास आघाडीवर पूर्ण विश्वास असून ते मला पाठिंबा देतील," असा विश्वास त्यांनी दर्शवला.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in