Nashik Graduate Constituency Election : "मी दुखी आणि..." सत्यजित तांबेंच्या निलंबनावर काय म्हणाले सुधीर तांबे?

काँग्रेसने (Nashik Graduate Constituency Election) नाशिक पदवीधर मतदार संघात निवडणुकीसाठी अपक्ष म्हणून उभे राहिलेले सत्यजित तांबे यांचे केले होते निलंबन
Nashik Graduate Constituency Election : "मी दुखी आणि..." सत्यजित तांबेंच्या निलंबनावर काय म्हणाले सुधीर तांबे?
Published on

नाशिक पदवीधर मतदार संघात (Nashik Graduate Constituency Election) मोठे नाट्य पाहायला मिळाले. निवडणुकीसाठी काँग्रेसचे (Congress) नेते सुधीर तांबे (Sudhir Tambe) यांचे पुत्र सत्यजित तांबे (Satyajeet Tambe) हे अपक्ष म्हणून उभे राहिले आणि काँग्रेसला मोठा धक्का बसला. यानंतर पक्षाने सत्यजित तांबे यांना निलंबित करत पाठिंबा देणार नसल्याचे स्पष्ट केले. यासर्व घडामोडीवर सुधीर तांबे यांनी मत व्यक्त करताना म्हंटले की, "मुलाला निलंबित केल्यामुळे मी दुखी आणि व्यथित आहे." असे म्हणत काँग्रेसच्या निर्णयावर नाराजी व्यक्त केली. दरम्यान, सत्यजित तांबे यांना पुढच्या ६ वर्षांसाठी पक्षातून निलंबित करण्यात आले आहे.

सुधीर तांबे म्हणाले की, "काँग्रेससाठी इतकी वर्ष काम केले, त्या पक्षाने मुलाला निलंबित केले. यामुळे मी दुखी आणि व्यथित आहे. आम्ही आमची भूमिका लवकरच स्पष्ट करणार आहोत. मी गेल्या १५ वर्षांपासून या मतदारसंघात काम करत आहे. आम्ही नेहमी लोकांच्या संपर्कात असतो. लोक आमचा विचार करतील, आणि आम्हाला न्याय देतील. आमची कोणाशीही चर्चा झालेली नाही. आम्ही कोणाकडेही पाठिंबा मागितला नाही. पण पक्षाने कारवाई केली, त्यामुळे आम्ही दुखी आहोत." असे म्हणत आपल्या भावना व्यक्त केल्या.

logo
marathi.freepressjournal.in