Satyajeet Tambe : उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आजचा शेवटचा दिवस; सत्यजित तांबे काय भूमिका घेणार?

पदवीधर विधानसभा निवडणुकीमध्ये आज अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे, तर नाशिकमध्ये सत्यजित तांबे (Satyajeet Tambe) काय भूमिका घेणार याकडे लक्ष
Satyajeet Tambe : उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आजचा शेवटचा दिवस; सत्यजित तांबे काय भूमिका घेणार?

राज्यामध्ये सध्या पदवीधर विधानसभा निवडणुकीकडे (Nashik Graduate Constituency Election) साऱ्यांचे लक्ष लागले आहे. नाशिक पदवीधर मतदारसंघामध्ये आलेल्या ट्विस्टमुळे आता सत्यजित तांबे (Satyajeet Tambe) आपली उमेदवारी मागे घेणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. काल काँग्रेसने सत्यजित तांबेंचे वडील सुधीर तांबे यांचे तात्पुरते चौकशी होईपर्यंत निलंबन केले. मात्र, काँग्रेसने अद्याप सत्यजित तांबेंवर कोणतीही कारवाई केलेली नाही. त्यामुळे आता ते काय भूमिका घेणार? असा प्रश्न सर्वांनाच पडला आहे. दरम्यान, भाजप नेते गिरीश महाजन हे नाशिकमध्ये दाखल झाले असून नाशिकची पदवीधर मतदारसंघाची निवडणूक बिनविरोध व्हावी , यासाठी त्यांच्यावर जबाबदारी दिल्याच्या चर्चा सुरु आहेत.

नेमकं प्रकरण काय?

नाशिक पदवीधर मतदारसंघाचा अर्ज भरण्याच्या अगदी शेवटच्या दिवशी काँग्रेसचे उमेदवार सुधीर तांबे यांनी स्वतःचा अर्ज ना भरता मुलगा सत्यजित तांबेचा उमेदवारीसाठी अर्ज भरला. त्यातही अपक्ष म्हणून सत्यजित तांबेंनी अर्ज भरल्यामुळे सर्वत्र चर्चेला उधाण आले. काँग्रेसचा आदेश डावलल्यामुळे त्यांच्यावर पक्षश्रेष्ठी नाराज असल्याच्या चर्चा सुरु झाल्या. तसेच, सत्यजित तांबेंना भाजपचा छुपा पाठिंबा असल्याच्याही चर्चा सुरु झाल्या. त्यानंतर काल काँग्रेसने जाहीर केले की, चौकशी होईपर्यंत सुधीर तांबेंच्या निलंबन केले गेले आहे. त्यामुळे आता सत्यजित तांबे काँग्रेसची साथ देणार की भाजपकडे जाणार? हा प्रश्न उपस्थित केला जात आहे. दरम्यान, काँग्रेसने आधीच सत्यजित तांबेंना पाठिंबा देणार नसल्याचे जाहीर केले आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in