द्राक्ष निर्यातीत २० टक्के घट; अवकाळी पावसाचा फटका

द्राक्ष पंढरी असलेल्या नाशिक जिल्ह्यातील द्राक्ष हंगाम अंतिम टप्प्यात आहे. ३१ मार्च आर्थिक वर्ष अखेरपर्यंत ८ हजार कंटेनरमधून १ लाख १० हजार मे. टन द्राक्षांची निर्यात झाली आहे. यंदा हंगामाच्या सुरुवातीला झालेल्या अवकाळी पावसामुळे द्राक्ष उत्पादनावर परिणाम झाला. त्यामुळे मागील वर्षीच्या तुलनेत २० टक्क्यांनी निर्यातीत घट झाली आहे.
द्राक्ष निर्यातीत २० टक्के घट; अवकाळी पावसाचा फटका
द्राक्ष निर्यातीत २० टक्के घट; अवकाळी पावसाचा फटकाहारून शेख
Published on

हारून शेख/ लासलगाव

द्राक्ष पंढरी असलेल्या नाशिक जिल्ह्यातील द्राक्ष हंगाम अंतिम टप्प्यात आहे. ३१ मार्च आर्थिक वर्ष अखेरपर्यंत ८ हजार कंटेनरमधून १ लाख १० हजार मे. टन द्राक्षांची निर्यात झाली आहे. यंदा हंगामाच्या सुरुवातीला झालेल्या अवकाळी पावसामुळे द्राक्ष उत्पादनावर परिणाम झाला. त्यामुळे मागील वर्षीच्या तुलनेत २० टक्क्यांनी निर्यातीत घट झाली आहे.

नाशिकमधील द्राक्षाची भारतातून युरोपियन देशांसह रशिया, फ्रान्स, युक्रेन, बेल्जियम, इंग्लंड, नॉर्वे, नेदरलँड, स्वीडन, पोलंड, स्पेनमध्ये निर्यात होते. उत्पादनात २० टक्के घट होऊनही यंदा निर्यात झालेल्या द्राक्षांना ९० ते १२५ रुपये प्रति किलो दर मिळाल्याने उत्पादकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.

द्राक्ष निर्यातदार व्यापारी लखन सावलकर म्हणाले की, अवकाळी पावसामुळे उत्पादनात घट झाली असली तरी, चांगल्या दरांमुळे शेतकऱ्यांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. द्राक्ष निर्यातीत घट झाल्याने शेतकऱ्यांनी उत्पादन तंत्रज्ञानात सुधारणा आणि हवामान बदलांना सामोरे जाण्यासाठी अधिक तयारी करणे आवश्यक आहे. सरकारनेही शेतकऱ्यांना आवश्यक ते सहकार्य आणि मार्गदर्शन, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.

द्राक्ष हंगाम अखेरच्या टप्प्यात असून यंदा माल कमी आहे. द्राक्ष निर्यातीत मागील हंगामाच्या तुलनेत यंदा महिन्यापूर्वी घट दिसत होती. मात्र गेल्या पंधरा दिवसांत निर्यातीत वाढ झाल्याने नाशिकमधून १ लाख १० हजार टन द्राक्ष निर्यात झाली आहे. मात्र गत वर्षीच्या तुलनेत २० टक्के निर्यातीत घट झाली आहे.

द्राक्ष उत्पादकांना अच्छे दिन

जगभरातून नाशिकच्या गोड आणि रसाळ द्राक्षांना वाढती मागणी असताना तुलनेत मालाचा पुरवठा कमी असल्याने पूर्ण हंगामात दरामध्ये तेजी दिसून आली. रशिया, मलेशिया अन् संयुक्त अरब अमिरातीतून मागणी वाढली होती. यंदाच्या हंगामात द्राक्ष मालाचे खुडे नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात सुरू झाले होते. त्यास प्रतिकिलो ११० ते १३० रुपयांपर्यंत चांगला दर मिळाला होता. गेल्या काही वर्षांपासून द्राक्ष उत्पादकांना सातत्याने नैसर्गिक संकटांना सामोरे जावे लागत होते. कोरोना काळानंतर तब्बल चार ते पाच वर्षांनी द्राक्ष हंगामात चांगला भाव मिळाला.

द्राक्ष हंगामाच्या सुरुवातीला झालेल्या अवकाळी पावसाचा द्राक्ष पिकाला फटका बसल्याने द्राक्षाच्या उत्पन्नावर परिणाम झाला. त्यामुळे गेल्या वर्षाच्या तुलनेत या द्राक्ष हंगामात २० टक्के द्राक्षांची कमी निर्यात झाली आहे.

- लखन सावलकर, द्राक्ष निर्यातदार व्यापारी, कोकणगाव

नेदरलँडला सर्वाधिक निर्यात

रशिया, युक्रेन, फ्रान्स, बेल्जियम, इंग्लंड, नॉर्वे, नेदरलॅण्ड, पोलंड, स्वीडन, स्पेन या देशांमध्ये नाशिकची द्राक्ष निर्यात झालीत. मात्र यंदादेखील सलग सहाव्या ते सातव्या वर्षी नेदरलॅण्डमध्ये द्राक्षांचे सर्वाधिक कंटेनर नाशिकहून मुंबईमार्गे समुद्री प्रवासाने पोहोचले आहेत.

logo
marathi.freepressjournal.in