Nashik : गोदा काठावर दोन महिने ‘नो एन्ट्री’; घाट परिसर विकसित करण्याच्या उद्देशाने निर्णय

नाशिक येथील गोदा काठ परिसरातील घाट विकसित करण्याच्या उद्देशाने रामकाल पथ प्रकल्पांतर्गत हा परिसर भाविकांसाठी आगामी दोन महिन्यांसाठी बंद करण्यात आला आहे.
Nashik : गोदा काठावर दोन महिने ‘नो एन्ट्री’; घाट परिसर विकसित करण्याच्या उद्देशाने निर्णय
Nashik : गोदा काठावर दोन महिने ‘नो एन्ट्री’; घाट परिसर विकसित करण्याच्या उद्देशाने निर्णय
Published on

नाशिक : नाशिक येथील गोदा काठ परिसरातील घाट विकसित करण्याच्या उद्देशाने रामकाल पथ प्रकल्पांतर्गत हा परिसर भाविकांसाठी आगामी दोन महिन्यांसाठी बंद करण्यात आला आहे. येत्या १६ जुलैपर्यंत हा आदेश लागू राहणार आहे.

आगामी सिंहस्थ कुंभमेळा लक्षात घेऊन करण्यात येणाऱ्या विकासकामांच्या पार्श्वभूमीवर रामकुंड परिसरात विविध सुधारणा करण्यात येणार आहेत. देशातील अत्यंत पवित्र स्थळांपैकी एक मानल्या जाणाऱ्या रामकुंडावर देशभरातील भाविक पूजाविधी, स्नान आणि पिंडदानासाठी दररोज मोठ्या संख्येने येत असतात.

Nashik : गोदा काठावर दोन महिने ‘नो एन्ट्री’; घाट परिसर विकसित करण्याच्या उद्देशाने निर्णय
विकासाच्या घोषणांआड दडलेली क्रूरता

तथापि, या कालावधीत भाविकांना दशक्रिया व अन्य धार्मिक विधींसाठी शेजारील पटांगणात पर्यायी सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच स्नान आणि पिंडदानासाठी गांधी तलाव, तर अस्थी विसर्जनासाठी अस्थीकुंड येथे व्यवस्था करण्यात आली आहे. यासंदर्भात महापालिका प्रशासन आणि पुरोहित संघ यांच्यात बैठक होऊन सुविधांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.

logo
marathi.freepressjournal.in