१ ऑगस्टपासून नाशिक-इंदूर विमान सेवा बंद; तीन महिन्यांत चौथ्यांदा ब्रेक, सेवा कपातीमुळे प्रवाशांमध्ये नाराजी

ओझर (नाशिक) विमानतळावरील धावपट्टीच्या कामामुळे नाशिकच्या विमानसेवा सुरळीत राहिल्या नसून मागील तीन महिन्यांत तीन शहरांशी थेट हवाई संपर्क खंडित झाला आहे. आता १ ऑगस्टपासून नाशिक-इंदूर विमानसेवा देखील बंद होणार असून, ही चौथी सेवा ठप्प होणार आहे.
१ ऑगस्टपासून नाशिक-इंदूर विमान सेवा बंद; तीन महिन्यांत चौथ्यांदा ब्रेक, सेवा कपातीमुळे प्रवाशांमध्ये नाराजी
Published on

हारून शेख/लासलगाव

ओझर (नाशिक) विमानतळावरील धावपट्टीच्या कामामुळे नाशिकच्या विमानसेवा सुरळीत राहिल्या नसून मागील तीन महिन्यांत तीन शहरांशी थेट हवाई संपर्क खंडित झाला आहे. आता १ ऑगस्टपासून नाशिक-इंदूर विमानसेवा देखील बंद होणार असून, ही चौथी सेवा ठप्प होणार आहे.

सध्या इंडिगो एअरलाइन्समार्फत नवी दिल्ली, अहमदाबाद, बंगळुरू, गोवा, हैदराबाद आणि इंदूर या शहरांसाठी नाशिकहून थेट विमानसेवा उपलब्ध आहे. ओझर विमानतळावरून दररोज सुमारे ८०० ते १००० प्रवासी प्रवास करत आहेत. तथापि, अलीकडील सेवा कपातीमुळे प्रवाशांमध्ये नाराजी आहे.

नाशिकच्या व्यापारी, औद्योगिक, शैक्षणिक तसेच पर्यटनवाढीसाठी विमानसेवा अत्यंत महत्त्वाची आहे. सलग सेवा बंदीमुळे नाशिकच्या आर्थिक व औद्योगिक घडामोडींवर प्रतिकूल परिणाम होण्याची शक्यता आहे. प्रशासनाने व जनप्रतिनिधींनी या परिस्थितीची गांभीर्याने दखल घेण्याची मागणी प्रवाशांमधून होत आहे.

प्रवासी संख्येत वाढ असूनही सेवा बंद

२०२३-२४ या आर्थिक वर्षात एप्रिल ते मार्च दरम्यान २,४२,३७२ प्रवाशांनी ओझर विमानतळाचा वापर केला होता. यावर्षी म्हणजे २०२४-२५ (एप्रिल ते मार्च) कालावधीत ही संख्या ३,४१,११२ वर गेली असून ४०.७% वाढ नोंदली आहे. प्रवासी संख्येत वाढ होत असतानाही विमानसेवा बंद होणे हे अनेकांसाठी आश्चर्याचा व निराशेचा विषय ठरत आहे.

जयपूर, नागपूरनंतर आता इंदूर सेवा बंद

  • जयपूर सेवा : १ फेब्रुवारीपासून सुरू झालेली ही सेवा अवघ्या दोन महिन्यांतच बंद करण्यात आली.

  • नागपूर सेवा : ३० मार्चपासून बंद.

  • नवी दिल्ली सेवा : धावपट्टी दुरुस्तीमुळे १ जूनपासून आठवड्यात फक्त तीन दिवसच उपलब्ध.

  • इंदूर सेवा : १ ऑगस्टपासून बंद होत असून, आधीच बुकिंग थांबवण्यात आले आहे.

logo
marathi.freepressjournal.in