नाशिक जिल्ह्यात आंबा पिकाची लागवड; आंब्याचे ३५०० हेक्टरपर्यंत लागवड क्षेत्र

नाशिक जिल्ह्यात कांदा, द्राक्ष पाठोपाठ सर्वाधिक प्रमाणात आंबा पिकाची लागवड झाली असून जिल्ह्यात आंब्याचे लागवड क्षेत्र ३५०० हेक्टरपर्यंत पोहोचले आहे.
नाशिक जिल्ह्यात आंबा पिकाची लागवड; आंब्याचे ३५०० हेक्टरपर्यंत लागवड क्षेत्र
Published on

लासलगाव : नाशिक जिल्ह्यात कांदा, द्राक्ष पाठोपाठ सर्वाधिक प्रमाणात आंबा पिकाची लागवड झाली असून जिल्ह्यात आंब्याचे लागवड क्षेत्र ३५०० हेक्टरपर्यंत पोहोचले आहे. कांदा, द्राक्ष पिकानंतर आंबा नाशिक जिल्ह्यातून सातसमुद्रा पार जात आहे.

भारतातून बांगलादेश, इंडोनेशिया मलेशिया, युरोप या देशांमध्ये कांद्याची मोठ्यात प्रमाणात तर द्राक्षाची स्पेन, जर्मनी, इटली, युरोपीय देशांमध्ये निर्यात होते. गेल्या तीन वर्षांपासून नाशिक जिल्ह्यातून केसर, बदाम आंब्याला अमेरिकेत मोठ्या प्रमाणात पसंती मिळत आहे.

गेल्या पाच ते सहा वर्षांपासून अनुदानामुळे आंबा पिकाच्या लागवडीत वाढ झाल्याचे दिसून येत आहे. यावर्षी जिल्ह्यात ३५०० हेक्टरवर आंबा पीक घेण्यात आले आहे. कळवण, सुरगाणा, सिन्नर, दिंडोरी या चार तालुक्यांखालोखाल निफाड तालुक्यातही आंबा लागवड क्षेत्र वाढले आहे. तसेच केशर आंब्याची लागवड जिल्ह्यात वाढली आहे. गावरान आंब्याची लागवडही चांगल्याप्रकारे झाली आहे. गुजरातच्या केशर आंब्याला नाशिकचा आंबा भारी पडत असल्याचे दिसून येते.

द्राक्षाच्या शेतीत आंब्याचा सुगंध

निफाड तालुक्यातील रानवड येथील आंबा उत्पादक शेतकऱ्याने पारंपरिक द्राक्ष शेतीला फाटा देत सहा एकरावर आंबा पिकाची लागवड केली. चार वर्षांनंतर गेल्यावर्षी १५ टन केशर आंब्याचे उत्पादन हाती आले. यातून ११ लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले. अशाच पद्धतीची आंबा पिकाची लागवड करून बळीराजा समृद्ध होत आहे.

logo
marathi.freepressjournal.in